लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि चकाचक डिस्प्लेसह येतोय सर्वात शक्तिशाली OnePlus 11; लाँचपूर्वीच फीचर्स लीक

OnePlus हा अँड्रॉइड मधील प्रतिष्ठित ब्रँड आहे. कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये वरच्या दर्जाच्या स्पेसिफिकेशन्ससाठी ओळखले जातात. आता आगामी वनप्लस फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या चर्चाना उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यावर्षीच्या अखेरपर्यंत OnePlus 11 Pro फ्लॅगशिप फोन ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. तर काही रिपोर्ट्समधून प्रो मॉडेल ऐवजी वनप्लस 11 बाजारात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आता प्रसिद्ध टिप्‍सटर डिजिटल चॅट स्टेशननं वनप्लस 11 संबंधित महत्वाची माहिती शेयर केली आहे. त्यानुसार आगामी वनप्लस 11 मध्ये कर्व्‍ड एज डिस्‍प्‍ले दिला जाईल, ज्याच्या वरच्या बाजूला डावीकडे पंच-होल मिळेल.

OnePlus 11 ची लीक डिजाईन आणि स्पेक्स

काही दिवसांपूर्वी आलेल्या रेंडर्सनुसार वनप्लस 11 प्रो स्मार्टफोनमध्ये कर्व्ड एज डिस्प्लेसह बाजारात येईल, ज्याच्या टॉप-सेंटरमध्ये पंच-होल असेल. आता टिप्‍सटर डिजिटल चॅट स्टेशननं सांगितलं आहे की वनप्‍लस 11 मध्ये मध्यभागी पंच-होल देण्यात येणार नाही. हा सीरिजमधील बेस मॉडेल असू शकतो. हे देखील वाचा: OPPO कडून दिवाळीची शानदार भेट! 1-2 नव्हे तर 5 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी

टिप्‍सटरनुसार आगामी वनप्लस 11 मधील पंच होल वरच्या बाजूला डावीकडे देण्यात येईल. कर्व्‍ड एज डिस्‍प्‍लेसह आगामी वनप्लस स्मार्टफोनची स्क्रीन 3216 x 1440 पिक्सलच्या 2K रेजॉलूशनला सपोर्ट करेल. त्यामुळे ग्राहकांना नक्कीच शानदार डिस्प्ले मिळेल, अशी अपेक्षा आहे. डिस्प्लेच्या रिफ्रेश रेटसह इतर कोणतीही माहिती मिळली नाही. परंतु दावा करण्यात आला आहे की फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 48 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर मिळेल.

OnePlus 11 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जी 120Hz रिफ्रेश रेट असलेली पंच-होल स्क्रीन असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या आगामी शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरची ताकद मिळू शकते, जो सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड चिपसेट असेल. जोडीला या वनप्लसमध्ये 16GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. OnePlus 11 स्मार्टफोन Android 13 वर चालू शकतो, ज्यावर कंपनीच्या ऑक्सिजन ओएसची स्किन असेल. या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. हे देखील वाचा: हा प्लॅन पाहून सिम पोर्ट करण्याची होईल इच्छा! 160 दिवसांची वैधता आणि 2GB डेली डेटा असलेला प्लॅन

फोटोग्राफीसाठी आगामी OnePlus 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 48MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP चा 2x टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतो. तर फ्रंटला 16MP चा कॅमेरा सेन्सर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरता येईल. त्याचबरोबर OnePlus 11 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, हॅस्सलब्लेड कॅमेरा आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस असे फीचर्स मिळतील. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS, आणि USB Type-C पोर्टचा पर्याय असेल. या फोनमध्ये कंपनीचा आयकॉनिक अलर्ट स्लायडर देखील पुन्हा दिसू शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here