OnePlus Nord N300 5G ची अमेरिकन बाजारात एंट्री

OnePlus Nord N300 5G launch: वनप्लस कंपनीनं टेक मार्केटमध्ये आपला नवीन मोबाइल फोन नॉर्ड एन300 5जी लाँच केला आहे. हा वनप्लस मोबाइल अमेरिकन बाजारात सादर करण्यात आला आहे जो मिडबजेट 5जी फोन आहे. OnePlus Nord N300 5G स्मार्टफोन 48MP Camera, 4GB RAM, MediaTek Dimensity 810 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. वनप्लस नॉर्ड एन300 5जी प्राइस व फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus Nord N300 5G Specifications

वनप्लस नॉर्ड एन300 5जी फोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.65 इंचाचा एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Nord N300 5G mobile phone launched check price Specifications details

OnePlus Nord N300 5G फोन सर्वात नवीन आणि अ‍ॅडव्हान्स अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ऑक्सीजन ओएस 13 सह मिळून काम करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा वनप्लस मोबाइल माली-जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord N300 5G ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह मिळून चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वनप्लस नॉर्ड एन300 5जी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

OnePlus Nord N300 5G स्मार्टफोन 5G SA/NSA सोबतच Dual 4G VoLTE वर पण चालतो. सिक्योरिटीसाठी या मोबाइल फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत

OnePlus Nord N300 5G Price

वनप्लस नॉर्ड एन300 5जी फोन सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे जो 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. OnePlus Nord N300 5G फोनची किंमत $228 म्हणजे भारतीय करंसीनुसार 18,000 रुपयांच्या आसपास आहे. अमेरिकेत हा स्मार्टफोन Midnight Jade कलरमध्ये सादर केला गेला आहे. कंपनीनं या हँडसेटच्या भारतीय लाँचची कोणतीही माहिती दिलेली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here