12 जीबी रॅम आणि 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आला हा पावरफुल फोन

टेक ब्रँड iQOO ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली ‘आईक्यू 5’ सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत जे iQOO 5 आणि iQOO 5 Pro नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हे दोन्ही फोन सध्या चीनी बाजारात लॉन्च केला गेले आहेत जे येत्या काही दिवसांत भारतासह इतर मार्केट मध्ये पण येतील. या सीरीज सोबत iQOO ने आपला पहिला फोन पण सादर केला आहे जो 120वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

डिस्प्ले क्वॉलिटी

iQOO 5 आणि iQOO 5 Pro कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत जे 6.56 इंचाच्या एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतात. हि स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येते. आईक्यू5 फ्लॅट स्क्रीन असलेला फोन आहे तर आईक्यू 5 प्रो मध्ये कर्व्ड एज असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन एचडीआर10+, पी3 कलर आणि 1300निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतात.

प्रोसेसिंग पावर

सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन एंडरॉयड 10 वर सादर केले गेले आहेत जे आईक्यू यूआई 5.0 वर चालतात. प्रोसेसिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे जो वीसी लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह चालतो. या दोन्ही फोन्सच्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम व 12 जीबी रॅम देण्यात आला आहे जो 128 जीबी स्टोरेज तसेच 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी

आईक्यू 5 सीरीजचे दोन्ही फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात ज्यात 50 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर iQOO 5 च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 8 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस देण्यात आली आहे तर iQOO 5 Pro च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस सह 13 मेगापिक्सलची पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आहे. हे दोन्ही फोन 16 मेगपिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

कनेक्टिविटी व बॅटरी

पावर बॅकअपसाठी iQOO 5 कंपनीने 4,500एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला आहे जी 55वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच iQOO 5 Pro कंपनीने 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे दोन्ही फोन डुअल सिम, 5जी, एनएफसी सारख्या फीचर्स सह येतात.

वेरिएंट्स व किंमत

iQOO 5 चा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 3998 युआन (जवळपास 43,000 रुपये) आहे. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 4298 युआन (जवळपास 46,300 रुपये) आहे तसेच सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 4598 युआन (जवळपास 49,500 रुपये) आहे.

iQOO 5 Pro बद्दल बोलायचे तर हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्याच्या बेस मॉडल मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमशः 4998 युआन (जवळपास 53,900 रुपये) तर 5498 युआन (जवळपास 59,300 रुपये) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here