आधार नंबर बद्दल सरकार ने दिली चेतावणी! जाणून घ्या काय आहे प्रकरण

आधार कार्ड किंवा आधार नंबर सध्या सर्व भारतीयांची सर्वात पहिली आणि सर्वात मोठी ओळख बनली आहे. भारतीय नागरिकांच्या ओळखी संबंधी सर्व माहिती आधार नंबर मध्ये असते. आधार कार्ड सुरवाती पासून चर्चेत आहे. काही जणांना हा सुरक्षित वाटत नाही तर काहींना हा सेफ वाटतो. गेल्या काही दिवसांत आधार कार्ड संबधी अशी मोठी घटना झाली आहे ज्यानंतर प्रत्येकाच्या गोपनीयतेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या दरम्यान यूआईडीएआई ने सक्त चेतावणी जाहिर केली आहे की कोणत्याही व्यक्तीने इंटरनेट किंवा सोशल साइट वर आपला आधार नंबर शेयर करू नये.

यूआईडीएआई म्हणजे भारतीय विशेष ओळख प्राधिकरण ने स्पष्ट शब्दांत आधार नंबर आॅनलाईन प्लॅटफार्म वर शेयर न करायाला सांगितले आहे. विभागाने सांगितले आहे की कोणत्याही व्यक्तीने आपल्या आधार नंबर किंवा आधार कार्ड संबधी माहिती आॅनलाईन प्लॅटफार्म वर शेयर करू नये. आधार ची सर्वेसर्वा असलेल्या यूआईडीएआई ने सांगितले आहे की आधार नंबर सार्व​जनिक करणार्‍या किंवा असे करायाला भाग पडणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. विभागाने चेतावणी देत काही दिवसांपूर्वी झालेल्या घटने पासून लोकांना शिकवण घ्यायला सांगितली आहे.

काय आहे प्रकरण

गेल्या आठवड्यात टेलीकॉम रेग्यूलेटरी अॅथारिटी आॅफ इंडिया म्हणजे ट्राई चे हेड आरएस शर्मा ने आपल्या ट्वीटर हँडल वर स्वतः चा आधार नंबर शेयर केला होता. आरएस शर्मा ने ट्वीट करून सांगितले होते की आधार नंबर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणताही हॅकर याचा सर्वर अ‍ॅक्सेस करू शकत नाही. शर्मा च्या या विधाना नंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरवात झाली.

काही यूजर्स ने ट्रोल करत सांगितले की, जर आधार इतकाच सुरक्षित असेल तर तुमचा आधार नंबर शेयर करा. आणि ट्वीटर वरील लोकांकडून मिळालेले हे चॅलेंज एक्सेप्ट कर आरएस शर्मा ने ट्वीट मध्ये आपला आपला आधार नंबर शेयर केला.

शर्मा यांनी आधार नंबर शेयर केल्यानंतर त्यांच्याच ट्वीटर अकाउंट वर लोक त्यांचीच खाजगी माहिती पोस्ट करू लागले. लोकांनी ने आरएस शर्मा चा फोन नंबर, त्यांच्या घराचा एड्रेस, त्यांचा व्हाट्सॅप नंबर, शर्मा वापरत असलेल्या फोनचा मॉडेल तसेच त्यांच्या व्हाट्सॅप वरील प्रोफाइल फोटो पण ट्वीटर वर शेयर केली.

हे इथेच थांबले नाही. लोकांनी शर्मा यांचे बँक डिटेल, त्यांचा अकाउंट नंबर तसेच पासपोर्ट नंबर पण त्यांना ट्वीट केला. इतकेच नव्हे तर लोकांनी त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे पण टाकायला सुरवात केली. काही यूजर्सनी आरएस शर्मा यांच्या अकाउंट मध्ये 1 रुपया ट्रांसफर केला. ट्वीटर वर घडलेल्या या प्रसंगानंतर शर्मा यांना मान्य करावेच लागले की आधार नंबर तितका सुरक्षित नाही जितका ते बोलत होते तर दुसरीकडे भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने यावर आक्षेप घेतला आहे.

तसेच यूआईडीएआई आरएस शर्मा यांच्या विरोधात काही कारवाई करेल की नाही हे स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे जेव्हा आधार ची सुरवात झाली होती तेव्हा या विभागाचे (भारतीय विशेष ओळख प्राधिकरणचे ) पहिले डायरेक्टर जनरल आरएस शर्मा च होते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here