Jio ला टक्कर देण्यासाठी Vi ने आणली खास ऑफर, या प्लान मध्ये फ्री देत आहे 50GB डेटा, जाणून घ्या माहिती

इंडियन टेलीकॉम सेक्टर मध्ये टॉप वर असलेल्या रिलांयस जियो आणि एयरटेल सारख्या कंपन्यांना आव्हान देण्यासाठी वोडाफोन आयडिया (Vi) ने पुन्हा एकदा खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतगर्त Vi आपल्या युजर्सना फ्री मध्ये 50GB डेटा ऑफर करत आहे. कंपनीने मोफत डेटा देण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण कंपनी अश्या ऑफर आणल्या आहेत. फ्री मिळणाऱ्या 50जीबी डेटा बद्दल बोलायचे तर 1,499 रुपयांच्या प्रीपेड प्लान वर हि ऑफर कंपनीच्या काही निवडक युजर्ससाठी सादर केली गेली आहे.

जाणून घ्या कोणत्या युजर्सना मिळेल हा फायदा

या ऑफरचा फायदा त्या युजर्सना मिळू शकतो, जे Vi ऍप वापरत आहेत. एक वोडाफोन युजरनुसार त्याला Vi ऍप ओपन केल्यावर कंपनी के 50GB फ्री डेटा ऑफरची माहिती मिळाली. 1499 रुपयांच्या वोडाफोन-आयडियाचा हा एक लॉन्ग टर्म प्लान आहे.

काही युजर्सने ट्विट करून अशी तक्रार केली आहे कि रिचार्ज केल्यावर पण युजरच्या अकाउंट मध्ये 50जीबी डेटा क्रेडिट नाही झाला. ट्वीट मध्ये युजरने आपल्या फोन वर आलेल्या मेसेज आणि ऍप ओपन केल्यावर मिळालेल्या नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट पण शेयर केला आहे.

365 दिवसांची वैधता

365 दिवसांच्या वॅलिडिटी सह येणाऱ्या या प्लान मध्ये कंपनी 24जीबी डेटा देते. तसेच 50जीबी फ्री डेटाची ऑफर जोडली तर या प्लान मध्ये मिळणार डेटा वाढून एकूण 74जीबी होतो.

फ्री मिळेल कॉलिंग

प्लान मध्ये सब्सक्राइबर्सना देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. 3600 फ्री एसएमएस सह येणाऱ्या या प्लान मध्ये कंपनी Vi Movies & TV चे पण फ्री ऍक्सेस देत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here