लॉन्च झाला जगातील पहिला डुअल पॉप अप कॅमेरा असलेला फोन VIVO NEX 3, 12 जीबी रॅम सह चालतो स्नॅपड्रॅगॉन 855+ वर

Vivo ने अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत शानदार आणि अनोखा स्मार्टफोन NEX 3 सादर केला आहे. कंपनीने Vivo NEX 3 आता चीनी बाजारात आणला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांत येईल. Vivo NEX 3 पावरफुल स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो तसेच या फोनचा लुक पण खूप खास आहे. Vivo NEX 3 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo NEX 3 कंपनीने 5G सपोर्ट सह बाजारात आणला आहे, चाल जाणून घेऊया फोनचे दमदार स्पेसिफिकेशन्स.

डिजाईन

Vivo NEX 3 च्या लीक झालेल्या फोटो मध्ये फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले वर बनेलला आहे जो दोन्ही साईडने बॅक पॅनलच्या दिशेने कर्वड झाला आहे. त्यामुळे Vivo NEX 3 च्या डिस्प्लेला वॉटरफॉल डिस्प्ले म्हटले जात आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बटण, सेंसर किंवा नॉच नाही. डिस्प्लेचा वरचा व खालचा भाग पण बेजल लेस आहे. Vivo NEX 3 मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही म्हणजे हा डिवाईस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

Vivo NEX 3 सेल्फी साठी पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात दोन सेंसर आहेत. दोन फ्रंट कॅमेरा सेंसर असल्यामुळे Vivo NEX 3 चा पॉप-अप मॉड्यूल पण रुंद आहे. फोनचा बॅक पॅनल शाईनी आणि ग्लॉसी आहे जो ग्लासचा आहे. Vivo NEX 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो राउंड शेप मध्ये आहे. बॅक पॅनल वर मधोमध एक रिंग आहे आणि या रिंग मध्ये तीन सेंसर आहेत. कॅमेरा सेटअप रिंगच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

पावरफुल स्पेसिफिकेशन्स

Vivo NEX 3 कंपनीने 1080 × 2256 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.39 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह येतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई ओएस वर सादर केला गेला आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालेल. विशेष म्हणजे हा चिपसेट 5जी ला पण सपोर्ट करतो त्यामुळे कंपनीने Vivo NEX 3 चा 5G मॉडेल पण टेक बाजारात आणला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo NEX 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर राउंड शेप मध्ये देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा ISOCELL Bright GW1 आहे. त्याचबरोबर नेक्स 3 मध्ये 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 13 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा बद्दल बोलायचे तर Vivo NEX 3 डुअल पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सह दोन सेंसर देण्यात आले आहेत.

Vivo NEX 3 कंपनीने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा एक वेरिएंट 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी च्या पावरफुल रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कपंनीने Vivo NEX 3 5जी सपोर्ट सोबत लॉन्च केला गेला आहे. तसेच पावर बॅकअप साठी Vivo NEX 3 मध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Vivo NEX 3 चा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज 4G वेरिएंट 4998 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार 50,000 रुपयांच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेला Vivo NEX 3 5G वेरिएंट 5698 युआन आणि 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज असलेला Vivo NEX 3 5G वेरिएंट 6198 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार क्रमश: 57,800 रुपये आणि 62,800 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here