6जीबी रॅम, 32-एमपी सेल्फी आणि 4500एमएएच बॅटरी सह भारतात लॉन्च झाला Vivo S1

Vivo ने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आज नवीन डिवाईस Vivo S1 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन सोबत Vivo ने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपल्या ‘एस सीरीज’ ची सुरवात पण केली आहे. ट्रिपल रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला Vivo S1 देशात 17,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो 8 ऑगस्टपासून ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. चला एक नजर टाकूया Vivo च्या या लेटेस्ट स्मार्टफोन वर.

Vivo S1 डिजाईन

वीवो ने एस सीरीजचा हा पहिला स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे आणि चारही कडांना अगदी बारीक बॉडी पार्ट आहे. फोन डिस्प्ले वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. Vivo S1 कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे ज्यामुळे फोन स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो.

अशाप्रकारे Vivo S1 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन सेंसर्स सोबत फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. Vivo S1 च्या रियर पॅनल वर कोणतेही फिजिकल सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Vivo चा लोगो आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर गूगल असिस्टेंट बटण आहे. अशाप्रकारे फोनच्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक, यूएसबी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे.

Vivo S1 स्पेसिफिकेशन्स

Vivo S1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे Vivo S1 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येतो, सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

Vivo S1 कंपनीने इंडियन मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 128जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला गेला आहे. Vivo S1 2.0 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo S1 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/ 2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-एंगल लेंस आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी Vivo S1 एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo S1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. इंडियन मार्केट मध्ये Vivo S1 स्काई लाईन ब्लू आणि डायमंड ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Vivo S1 किंमत

4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 17,990 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 18,990 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 19,990 रुपये

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here