टेक कंपनी वीवोने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन फोन Vivo V19 लॉन्च केला आहे. हा डिवाईस 27,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो उद्या म्हणजे 15 मे पासून देशात सेलसाठी उपलब्ध होईल. याच आठवड्यात कंपनीने Vivo G1 नावाचा एक फोन इंटरनेशनल मार्केट मध्ये पण आणला आहे जो सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट सह येईल. वीवो जी1 च्या भारतातील लॉन्चची स्थिती अजून स्पष्ट झालेली नाही पण या दोन मोठ्या लॉन्च नंतर वीवोचा अजून एक नवीन फोन समोर आला आहे. Vivo चा हा बेनाम स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.
Vivo चा हा आगामी स्मार्टफोन गीकबेंच वर Vivo TD2003F_EX मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग कालची म्हणजे 13 मे ची आहे जी सर्वात आधी 91मोबाईल्सने स्पॉट केली आहे. इथे वीवोच्या या आगामी स्मार्टफोनच्या नावाची माहिती तर देण्यात आलेली नाही पण फोनच्या रॅम व चिपसेट सोबतच इतर महत्वाची माहिती समजली आहे. गीकबेंच वर हा फोन 8 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे.
हा आगामी वीवो फोन गीकबेंच वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. फोन मध्ये 1.80गीगाहर्ट्जचा आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे तसेच लिस्टिंग मध्ये Vivo TD2003F_EX मॉडेल नंबरच्या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट दिला जाणार असल्याचे पण समोर आले आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता वीवोच्या या आगामी डिवाईसला सिंगल-कोर मध्ये 2637 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 6493 स्कोर मिळाला आहे.
Vivo V19
वीवो वी19 पाहता या फोन मध्ये 6.44-इंच FHD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि स्क्रीन रेज्योल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये 2.3GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC देण्यात आलेला आहे. फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह आला आहे. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. तसेच फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो.
फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. फोन मध्ये अपर्चर f/1.79 सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची सेकेंडरी वाइड अँगल लेंस, f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची बोके लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. या फोनची सर्वात खास बाब अशी कि फोनच्या फ्रंटला डुअल-पंच होल कॅमेरा आहे. वीवो वी19 मध्ये अपर्चर f/2.08 सह 32 मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि f/2.28 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची लेंस आहे.
Vivo V19 दोन कलर ऑप्शन Piano Black आणि Mystic Silver मध्ये सादर केला गेला आहे तसेच फोनचा 8 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,990 रुपये तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
वीवो वी19 वीडियो
















