लॉन्चच्या आधी सलमान खानच्या हातात दिसला Vivo V17 Pro, बघा कसा आहे याचा लुक

जगात सर्वात आधी 91मोबाईल्स ने हि माहिती दिली होती कि Vivo आपल्या नवीन फ्लॅगशिप फोन V17 आणि वी17 प्रो ची तयारी करत आहे. सोबतच आम्ही अशी पण माहिती दिली होती कि या फोन मध्ये डुअल पॉप—अप कॅमेरा असेल. पण आता पर्यंत फोनच्या लॉन्च डेट किंवा याच्या इतर स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नव्हती. परंतु आज कंपनीने स्वतः याची माहिती दिली आहे. नुकतेच Color TV ने प्रमुख रियालीटी शो BiggBoss च्या प्रमोशनची सुरवात केली आहे आणि यात फोन दाखवण्यात आला आहे. सलमान खान या फोन सोबत दिसत आहे आणि प्रमोशनच्या शेवटी Vivo V17 Pro मॉडेलचे नाव पण तुम्ही ऐकू शकता. त्यामुळे आम्हाला असे वाटते कि लवकरच कंपनी हा फोन सादर करू शकते आणि भारतात Vivo V17 सीरीज सर्वात आधी लॉन्च केली जाऊ शकते.

कसा आहे Vivo V17 Pro

प्रमोशनची सुरवातच Vivo V17 Pro पासून झाली आहे. सर्वात आधी स्क्रीन वर फोन दिसतो आणि त्यात वीवोचा लोगो दिसतो. सलमान खान फोनच्या मागे लपलेला असतो आणि फोनच्या शॉट नंतर तो बाहेर येतो. त्यानंतर बिगबॉसच्या नवीन सीजनची माहिती दिली जाते कि चार आठवड्यानंतरच फाइनलची टिकट मिळेल आणि शेवटी माहिती देण्यात आली आहे कि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत Vivo V17 Pro. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो कि लवकरच भारतात Vivo V17 Pro येऊ शकतो.

या प्रमोशन वीडियो मध्ये तुम्ही फोनचा थोडा लुक बघू शकता. सलमानच्या हातात जो डिवाइस आहे, तो हलक्या आकाशी रंगाचा आहे जो खूप आकर्षक वाटत आहे. असाच रंग आपण वीवोच्या एस1 मॉडेल मध्ये पण बघितला होता पण डिजाइन खूप वेगळी आहे. याची बॉडी थोडी कर्व्ड आहे आणि ग्लास फिनिश पण आहे. फोनची रुंदी बघून समजून जा कि स्क्रीन खूप मोठी मिळेल.

Vivo V17 Pro चे स्पेसिफिकेशन

आता पर्यंत जी माहिती आम्हाला मिळाली आहे त्या नुसार Vivo V17 Pro कंपनी क्वाड कॅमेरा सेटअप सह सादर करू शकते. फोन मध्ये 48-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, त्याचबरोबर 8-मेगापिक्सल, 5-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळू शकतो. राहिला प्रश्न फ्रंटच तर आता पर्यंत जास्त माहिती नाही मिळाली पण आता पर्यंत ज्या बातम्या आम्हाला मिळाल्या आहेत त्या नुसार पॉप—अप मध्ये डुअल कॅमेरा असेल आणि कंपनी 16-मेगापिक्सल कॅमेरा सेंसरचा वापर करेल.

याआधी Vivo V15 Pro स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह सादर केला गेला होता. आता नवीन फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर येऊ शकतो. कंपनी हा 6जीबी आणि 8जीबी मेमरी ऑप्शन मध्ये सादर करू शकते. त्याचबरोबर Vivo V17 Pro मध्ये 128 GB आणि 256 GB ची इंटरनल स्टोरेज असू शकते. आता हा फोन लॉन्च होण्यास जवळपास एक महीना आहे आणि याच काळात अनेक लीक्स समोर येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here