1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात

Highlights

  • Vivo V27 Series 1 मार्चला भारतात लाँच होईल.
  • सीरीज अंतगर्त Vivo V27, V27 Pro आणि V27e येऊ शकतात.
  • Vivo V27 Pro ची प्राइस 40 हजारांच्या असपास असेल.

Vivo V27 Series कंपनी अनेक दिवस सतत टीज करत आहे. सीरीज अंतगर्त Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27e स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात तसेच कंपनीनं आपल्या नवीन मोबाइल फोन्सचे फोटोज आणि अनेक फीचर्स इंटरनेटवर दाखवले आहेत. तसेच आता ‘वी27 सीरीज’ ची लाँच डेट देखील समोर आली आहे. येत्या 1 मार्चला विवो 27 स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जातील.

Vivo V27 India Launch

विवो कंपनीनं आपल्या ग्लोबल वेबसाइटवर वी27 सीरीज लाँचचा काउंटडाउन सुरु केला आहे जो आजपासून 8 दिवस आणि 13 तासांचा आहे. म्हणजे आठ दिवसांनी Vivo V27 Series 1 मार्चला लाँच होईल. या दिवशी स्मार्टफोन सीरीजचा ग्लोबल लाँच होईल आणि ही सीरिज भारतीय बाजारात येईल. उलटमोजणीनुसार 1 मार्चला दुपारी 12 वाजता विवो वी27 सीरीजचा लाँच इव्हेंट सुरु होईल. या दिवशी सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्सच्या नावांची आणि त्यांच्या किंमतीची पुष्टी होईल.

Vivo V27 Price

लीकमध्ये Vivo V27 आणि Vivo V27 Pro ची किंमत शेयर करण्यात आली आहे. वी27 ची प्राइस 35,000 रुपयांच्या आसपास असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच प्रो मॉडेलबद्दल सांगण्यात आलं आहे की हा 8 जीबी रॅमसह लाँच होईल, जोडीला 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेज दिली जाईल. या फोनची प्रारंभिक किंमत 40 हजार रुपयांच्या आसपास असल्याच सांगण्यात आलं आहे.

Vivo V27 Series Specifications

विवोनं कंपनी वेबसाइटवर खुलासा केला आहे की या वी27 सीरीजमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेली 3डी डिस्प्ले दिली जाईल जी कर्व्ड पॅनलवर बंडाळी असेल. फोनचे फोटोज ऑफिशियल करण्यात आले आहेत ज्यात लुक आणि डिजाईन पाहता येईल. चर्चा आहे की विवो वी27 भारतात लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक डिमेन्सिटी 7200 चिपसेटसह येईल.

समोर आलेल्या डिटेल्सनुसार, हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा विवो फोन black रंग सोबतच color changing blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

विवो वी27 प्रो मॉडेल SONY IMX766V रियर कॅमेरा सेन्सरसह येईल, हे कंपनीनं प्रोडक्ट पेजवर दाखवलं आहे. चर्चा आहे की हा स्मार्टफोन मॉडेल मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 चिपसेटसह भारतीय बाजारात येईल. सीरीजमधील स्मार्टफोन्स आणि त्यांच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 1 मार्चची वाट पाहिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here