लाँच होण्याआधीच Flipkart लिस्ट झाली Vivo V27 सीरीज

Highlights

  • Flipkart वर Vivo V27 Series लिस्ट करण्यात आली आहे.
  • कंपनीनं नवीन सीरीजला TheSpotlightPhone अशी टॅगलाईन दिली आहे.
  • फोन्स मध्ये मीडियाटेकचे डिमेन्सिटी प्रोसेसर मिळतील.

गेली कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आता Vivo नं भारतात आपल्या V-सीरीजचे नवीन फोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीनं Vivo V27 सीरीज फ्लिपकार्ट आणि विवो ई-स्टोरच्या माध्यमातून टीज केली आहे. टीजरमधून स्पष्ट झालं आहे की लवकरच ही सीरिज भारतीयांच्या भेटीला येईल. विवोनं आपल्या आगामी V-सीरीजला TheSpotlightPhone अशी टॅगलाईन दिली आहे.

Vivo V27 Series India Launch

Vivo V27 Series मध्ये दोन फोन सादर केले जातील. Flipkart वरील पोस्टरनुसार एक किंवा दोन्ही फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले मिळू शकतो. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम बटन आणि ब्लू कलरमध्ये पावर बटन दिसत आहे. विवो वी27 सीरीज ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध होऊ शकते. ज्यात तीन कॅमेरा सेन्सर, रेक्टेंगुलर वर्टिकल मॉड्यूल आणि सर्कुलर एलईडी फ्लॅश दिसत आहे. कंपनीनं अद्याप लाँच डेट सांगितली नाही परंतु ही सीरीज या महिन्याच्या अखेरपर्यंत सादर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे देखील वाचा: जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन तेंडुलकर; Mahindra च्या तीन Electric Cars आल्या जगासमोर

Vivo V27 Series Specifications

Vivo V27 series मध्ये कंपनी दोन स्मार्टफोन्सचा समावेश करू शकते. एकाचे नाव Vivo V27 असू शकते तर दुसरा मोबाइल फोन Vivo V27 Pro नावानं बाजारात येऊ शकतो. नावावरून समजलं असेल की प्रो मॉडेलची ताकद सीरीजच्या वॅनिला मॉडेलच्या तुलनेत जास्त असू शकते. दोन्ही डिवाइसमध्ये तुम्हाला कलर चेंजिंग बॅक पॅनल मिळू शकतो.

विवो वी27 स्मार्टफोन भारतात लाँच होणारा पहिला असा स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक डिमेनसिटी 7200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. याआधी कोणताही मोबाइल फोन आतापर्यंत या प्रोसेसरसह भारतात आला नाही. विवो वी27 प्रो देखील मीडियाटेेक चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले दिला जाऊ शकतो तसेच यात Sony IMX कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. सीरीजचा वॅनिला मॉडेल देखील अशाच स्क्रीन आणि कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार विवो वी27 आणि विवो वी27 प्रो दोन्ही स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर केले जाऊ शकतात. यांच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हे विवो फोन black सह color changing blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतात. हे देखील वाचा: चिनी 5G Phone आवडत नाहीत? भारतीय मोबाइल कंपनी लावाचा 5जी फोन होतोय लाँच

Vivo V27 आणि V27 Pro ची किंमत

विवो वी27 आणि वी27 प्रो दोन्ही स्मार्टफोन हायएन्ड डिवायस असतील. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Vivo V27 ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तर Vivo V27 Pro स्मार्टफोन देखील 40,000 रुपयांच्या रेंज मध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here