Vivo V30 5G वर मिळत आकर्षक डिस्काऊंट, फक्त 31 जुलैपर्यंत आहे ऑफर

विवोने मार्च मध्ये आपला प्रीमियम स्माटफोन Vivo V30 5G लाँच केला होता. याला भारतीय युजर्सद्वारे आतापर्यंत चांगली प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, आता कंपनी V40 सीरीज लाँच करणार आहे. ब्रँड पूर्व मॉडेलवर 3,799 रुपयांपर्यंत इंस्टंट देणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला थोडे लवकर हा खरेदी करावा लागेल, कारण ही ऑफर फक्त 31 जुलैपर्यंत आहे. चला, पुढे नवीन किंमत, सूट आणि स्पेक्स सविस्तर जाणून घेऊया.

Vivo V30 5G डिस्काऊंट ऑफर

  • भारतीय बाजारात Vivo V30 स्मार्टफोन तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच झाला होता.
  • कंपनीद्वारे तिन्ही मॉडेलवर एचडीएफसी, एसबीआय क्रेडिट/ डेबिट कार्ड स्वाईप आणि EMI ट्रँजॅक्शनवर 10 टक्क्यांची सूट दिली जात आहे.
  • डिव्हाईसच्या 8GB रॅम +128GB स्टोरेजच्या डिस्काऊंट नंतर मात्र 30,600 रुपयांमध्ये घेतला जाऊ शकतो. ज्याची पूर्व मध्ये किंमत 33,999 रुपये आहे.
  • मिड मॉडेल 8GB रॅम +256 जीबी मॉडेल ऑफरनंतर 32,400 रुपयांचा झाला आहे. ज्याची किंमत पहिली 35,999 रुपये होती.
  • टॉप व्हेरिएंट 12 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज 10 टक्के सूट सह 34,200 रुपयांमध्ये मिळत आहे. हा पहिला 37,999 रुपयांचा विकला जात होता.
  • बँक डिस्काऊंटसह ब्रँड 6 महिने नो कॉस्ट EMI सुविधा पण देत आहे. तसेच जुन्या फोनचा एक्सचेंज ऑप्शन पण आहे.
  • तसेच ही ऑफर सध्या फक्त विवो E-स्टोरवर आहे. जो येत्या 31 जुलै पर्यंत चालेल. तुम्ही लिंकव्हर क्लिक करून पण डायरेक्ट वेबसाईटवर ऑफर पाहू शकता.
  • युजर्सना डिव्हाईससाठी अंडमान ब्लू, पीकॉक ग्रीन आणि क्लासिक ब्लॅक सारखे तीन कलर मिळतील.

Vivo V30 5G फ्लिपकार्ट ऑफर

  • Vivo V30 5G ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर पण सेल होत आहे. येथे पण तुम्हाला फोनवर जवळपास 3,400 रुपयांपर्यंतचा इंस्टंट बँक डिस्काऊंट मिळेल.
  • जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करत आहात तर 5 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जाईल.
  • फ्लिपकार्ट शॉपिंग साईटवर तुम्हाला 3 ते 6 महिन्याचा नो कॉस्ट EMI चा पर्याय मिळेल.
  • जर तुम्ही फ्लिपकार्टवरून Vivo V30 फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर या लिंकवर क्लिक करून ऑफर पाहू शकता. ही ऑफर पण 31 जुलैपर्यंत आहेत.

Vivo V30 5G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Vivo V30 मध्ये 6.78 इंचाचा एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 2800 x 1260 पिक्सल रिजॉल्यूशन, एचडीआर 10 प्लस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800 निट्स पीक ब्राईटनेस मिळते.
  • प्रोसेसर: फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट देण्यात आली आहे. तसेच अल्ट्रा स्मार्ट कूलिंग सिस्टम पण लावण्यात आली आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर 12 जीबी पर्यंत रॅम एक्सपांशनची सुविधा आहे.
  • कॅमेरा: Vivo V30 5G ड्युअल रिअर कॅमेऱ्यासह येतो. ज्यात OIS तसेच ऑरा लाईट फिचर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी पण 50 मेगापिक्सलची लेन्स आहे.
  • बॅटरी: कंपनीने डिव्हाईसमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. याला चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here