स्वस्त Samsung Galaxy F15 5G चा सपोर्ट असलेला फोन कंपनीच्या साइटवर झाला लिस्ट, लवकर करेल धमाकेदार एंट्री

Highlights

  • सॅमसंग F सीरीजमध्ये आपल्या नवीन बजेट 5G डिवाइसच्या लाँचच्या तयारीमध्ये आहे.
  • गॅलेक्सी F15 5G सॅमसंगच्या अधीकृत सपोर्ट वेबसाइटवर दिसला आहे.
  • फोन आधी BIS सर्टिफिकेशनवर दिसला आहे.

सॅमसंग 2024 मध्ये आपल्या पहिल्या F-सीरीज स्मार्टफोनच्या लाँचची तयारी करत आहे. F-सीरीज ऑनलाइन चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते आणि ही बजेट सेगमेंटमध्ये कंपनी द्वारे सादर केली जाते. तसेच, या लाइनअपमध्ये येणारा नवीन डिवाइस सॅमसंग गॅलेक्सी F15 5G असू शकतो. हा डिव्हाइस भारत आणि बांग्लादेशसाठी सॅमसंगच्या अधिकृत सपोर्ट वेबसाइटवर दिसला आहे. चला पुढे फोनचे नवीन लीक व आजपर्यंत समोर आलेली माहितीबाबत पाहून घेऊ.

सॅमसंग गॅलेक्सी F15 5Gला सपोर्ट पेज डिटेल

91mobiles नं सॅमसंग इंडियाच्या अधिकृत सपोर्ट वेबसाइटवर फोनचे मॉडेल नंबर SM-E156B/DS सह पहिला आहे. याव्यतिरिक्त, डिवाइस बांग्लादेशच्या अधिकृत वेबसाइटवर देखील या मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.

विशेष म्हणजे सॅमसंगनं गेल्यावर्षी भारतात Galaxy F14 5G लाँच केला होता. डिवाइसला आता Samsung Galaxy F15 5G च्या रूपात एक उत्तराधिकारी मिळू शकतो. परंतु कंपनीनं आतापर्यंत डिवाइस बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती शेअर केलेली नाही.

डिवाइस भारतात लाँच होण्याचे संकेत देण्याची ही आम्ही पहिली वेळ नाही. फोन आपल्या गॅलेक्सी एम15 5जी सह बीआयएस सर्टिफिकेशनवर दिसला होता. मॉडेल नंबर SM-E156B मॉडेल नंबरसह Galaxy F15 5G बीआयएस वर दिसला होता.

Samsung Galaxy F14 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 90Hz Screen
  • Samsung Exynos 1330
  • 50MP Rear Camera
  • 13MP Selfie Camera
  • 25W 6,000mAh Battery
  • स्क्रीन: सॅमसंग गॅलेक्सी F14 5G मध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. कंपनीने यात गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळते.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी हा ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
  • प्रोसेसिंग : सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जी फोन कंपनीच्या एक्सिनॉस 1330 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. तसेच, फोनमध्ये 4 जीबी रॅम तसेच 6 जीबी रॅम मिळतो. हा मोबाइल 6जीबी एक्सपांडेबल रॅमला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे याची 12जीबी रॅम पर्यंतची ताकद मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here