1 नोव्हेंबर पासून फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल वीवो वी9 प्रो 4जीबी रॅम मॉडेल, किंमत 15,990 रुपये

वीवो ने वी9 च्या मध्यमातून नॉच स्क्रीनची सुरवात केली होती आणि नंतर कंपनीने याचा अपग्रेड वेरियंट वी9 प्रो सादर केला होता. हा फोन आॅनलाइन स्टोर अमेझॉन इंडिया वर उपलब्ध आहे तिथे याची किंमत 17,990 रुपये आहे आणि फोन मध्ये 6जीबी रॅम आहे. कंपनीने आता याचा 4जीबी वेरियंट सादर करणार आहे आणि या मॉडेलची किंमत 15,990 रुपये असेल. विशेष म्हणजे वीवो वी9 प्रो चा 4जीबी वेरियंट आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल. 1 नोव्हेंबर पासून हा फोन खरेदी करता येईल.

रॅम व्यतिरिक्त फोनच्या बाकी स्पेसिफिकेशन मध्ये जास्त फरक नाही. वीवो वी9 प्रो 19:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे जो नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. यात 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देनाय्त आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास सह येतो.

हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 सह सादर करण्यात आला आहे तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो . तसेच ग्राफिक्स साठी वी9 प्रो मध्ये एड्रेनो 512जीपीयू देण्यात आला आहे. दोन्ही रॅम मॉडेल सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो चा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो वी9 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here