विवोने आपल्या एक्स 100 सीरिजचा विस्तार करत यात फोटोग्राफी, गेमिंग, लूक चार्जिंगसह जबरदस्त स्माटफोन Vivo X100 Ultra लाँच केला आहे. हा डिव्हाईस होम मार्केट चीनमध्ये 16GB रॅम, 200 मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा, 5500mAh बॅटरी, 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले, 30 वॉट वायरलेस चार्जिंग, स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट, पाणी, धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP68/69 रेटिंग सारख्या अनेक फिचर्ससह आला आहे. चला, पुढे किंमत आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Vivo X100 Ultra चे स्पेसिफिकेशन
6.78-इंचाचा कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले
स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट
16 जीबी +1 टीबी स्टोरेज
200MP पेरिस्कोप लेन्स
5,500mAh ची बॅटरी
80W चार्जिंग
सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी
IP69/IP68 रेटिंग
- डिस्प्ले: Vivo X100 Ultra फोनमध्ये 6.78-इंचाचा कर्व्ड-एज सॅमसंग E7 अॅमोलेड LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 3200 x 1440 पिक्सल रिजॉल्यूशन, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 3000 निट्स पीक ब्राईटनेस, 1440 हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंगला सपोर्टची सुविधा आहे.
- प्रोसेसर: विवोच्या या फ्लॅगशिप मोबाईलमध्ये ब्रँडने क्वॉलकॉमचा आता पर्यंतचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 लावला आहे.
- स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत हा तीन स्टोरेजमध्ये येतो ज्यात टॉप मॉडेलमध्ये 16 जीबी LPDDR5x रॅम आणि 1 टीबी यूएफएस 4.0 इंटरनल स्टोरेज मिळते.
- कॅमेरा: मोबाईलच्या रिअर पॅनलवर ब्रँडने OIS अँटी-शेक टेक्नॉलॉजी असलेला 50MP चा सोनी LYT-900 लेन्स, 50MP सॅमसंग S5KJN1 अल्ट्रा वाईड लेन्स आणि 200MP पेरिस्कोप सॅमसंग S5KHP9 लेन्स 3.7x ऑप्टिकल झूम, 100x डिजिटल झूम दिले आहे. हेच नाही तर फोनमध्ये कॅमेरा एक्सपीरियंससाठी विवो V3+ इमेजिंग चिप पण लावली आहे.
- फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसह रिल बनविण्यासाठी युजर्सना 50MP सॅमसंग S5KJN1 लेन्स मिळते.
- बॅटरी: या पावर फूल विवो अल्ट्रा डिव्हाईसमध्ये ब्रँडने 5,500mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. याला लवकर चार्ज करण्यासाठी 80W वायर्ड आणि 30W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे.
- इतर: मोबाईलमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल स्पिकर, एक्स-अॅक्सिस लीनियर मोटर, ड्युअल सिम, 5 जी, वाय-फाय 7, ड्युअल-फ्रीक्वेंसी जीपीएस, एनएफसी, आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ 5.4, यूएसबी-सी (यूएसबी 3.2), सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी (फक्त 16 जीबी + 1 टीबी ऑप्शन) पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP69/IP68 रेटिंग सारखे फिचर्स आहेत.
- ऑपरेटिंग सिस्टम: Vivo X100 Ultra फोन अँड्रॉईड 14 आधारित ओरिजिनओएस 4 वर चालतो.
- वजन आणि डायमेंशन: हा विवो डिव्हाईस 164.07 x 75.57 x 9.23 मिमी आणि 229 ग्रॅमचा आहे.
Vivo X100 Ultra ची किंमत
- Vivo X100 Ultra फोन चीनमध्ये तीन स्टोरेज मध्ये लाँच झाला आहे. फोनच्या 12GB रॅम +256GB स्टोरेजची किंमत 6,499 CNY म्हणजे जवळपास 75,100 रुपये आहे.
- मिड मॉडेल 16GB रॅम +512GB स्टोरेज चीनी चलनानुसार 7,299 CNY आणि भारतीय किंमतीनुसार 84,200 रुपयांचा आहे.
- टॉप मॉडेल 16GB रॅम +1TB स्टोरेज सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी मॉडेल 7,999 CNY जवळपास 92,300 रुपयांना मिळेल.
- फोनसाठी युजर्सना टायटेनियम, व्हाईट मूनलाईट, स्पेस ग्रे सारखे तीन कलर ऑप्शन मिळतील.














