Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन कंपनीने फ्लॅगशिप फोन म्हणुन चीन मध्ये लॉन्च केले होते जे 22 मार्चला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केले जातील. Vivo X50 सीरीजचे अपग्रेडेड वर्जन म्हणुन येणारी ही सीरीजच्या इंडिया लॉन्चबद्दल आता कंपनीने सांगितले आहे. वीवो इंडियाने ट्विटरवर घोषणा केली आहे कि लवकरच भारतात Vivo X60 लॉन्च केली जाईल. पण लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण बोलले जात आहे की. 22 मार्चला भारतात हा सादर केला जाईल. या दोन्ही फोन्स मध्ये अनेक खास खास फीचर्स आहेत, जसे की वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो दोन्ही फोन Samsung च्या Exynos 1080 प्रोसेसर आणि E3 AMOLED डिस्प्ले सह येतात.
मिळाले अनेक सर्टिफिकेशन
या सीरीजमधील Vivo X60 Pro (V2046) अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट जसे की Indonesia Telecom, EEC आणि BIS वर दिसला आहे. तसेच आम्ही या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की वीवो एक्स 60 सीरीज मार्चच्या शेवटी भारतात लॉन्च होईल. या लाइनअप मध्ये विवो X60, X60 Pro आणि संभवतः X60 Pro + चा पण समावेश होण्याची शक्यता आहे, तसेच आम्हाला माहिती मिळाली होती की कंपनी Vivo X60 Pro + त्याच्या आसपास घेऊन येऊ शकते. त्यामुळे हा X60 + ची जागा घेऊ शकतो.
The neXt level of photography is on its way. #vivoX60Series co-engineered with @ZEISSLenses is launching soon. #StayTuned. pic.twitter.com/UG23hVflR0
— Vivo India (@Vivo_India) March 10, 2021
Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.
फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूमसह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थसह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.
Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.














