5000mAh च्या बॅटरीसह Vivo Y02 जागतिक वेबसाइटवर लिस्ट; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 Launch: विवो कंपनीनं आज टेक मंचावर आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन सादर करत विवो वाय02 लाँच केला आहे. हा स्वस्त विवो मोबाइल कंपनीच्या ग्लोबल वेबसाइटवर ऑफिशियल झाला आहे जो येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारात देखील लाँच केला जाईल. विवो वाय02 स्मार्टफोन 3GB RAM, MediaTek चिपसेट आणि 5,000 Battery ला सपोर्ट करतो ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Vivo Y02 ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

विवो वाय02 स्मार्टफोन 2.5डी यूनिबॉडी डिजाइनवर बनली आहे. हा मोबाइल फोन 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह येते जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. Vivo Y02 चे डायमेंशन 163.99×75.63×8.49एमएम आणि वजन 186 ग्राम आहे. हे देखील वाचा: 500km रेंज असलेली Pravaig Defy Electric SUV लाँच; झटक्यात मिळेल 210km चा वेग

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 गो एडिशन आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स इन्स्टाल व रन करता येतात. हे गुगल गो अ‍ॅप्लीकेशन कमी रॅममध्ये देखील स्मूद प्रोसेस करतात. हा अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात तसेच इंटरनेटचा वापर देखील कमी करतात. विवो वाय02 मीडियाटेक चिपसेटला सपोर्ट करतो परंतु कंपनीनं अजूनही प्रोसेसरची माहिती दिली नाही.

Vivo Y02 launched know price and Specification details

फोटोग्राफीसाठी विवो वाय02 स्मार्टफोन सिंगल रियर आणि सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y02 रियल ड्युअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड्ससह एक 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड देखील वापरता येतो. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 20 पेक्षा जास्त ओप्पो मोबाइल्स आणि गॅजेट्सवर दणकट डिस्काउंट! OPPO winter season sale झाला सुरु

Vivo Y02 launched know price and Specification details

Vivo Y02 Price

विवो वाय02 ग्लोबल वेबसाइटवर दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लिस्ट करण्यात आला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम देण्यात आला आहे तर दुसरा व्हेरिएंट 3 जीबी रॅमला सपोर्ट करतो. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं अजूनतरी विवो वाय02 स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली नाही. हा मोबाइल फोन Orchid Blue आणि Cosmic Grey कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here