Vivo X90 Pro+ 5G झाला गिकबेंचवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स झाले लीक

Vivo X90 Series बद्दल अलीकडेच लीक समोर आलं होतं की विवो कंपनी लवकरच Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro Plus स्मार्टफोन लाँच करू शकते. या तिन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा डिपार्टमेंटची माहिती देखील लीक झाली होती. आता विवो एक्स90 सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल विवो एक्स90 प्रो प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे, त्यामुळे लाँचपूर्वीच Vivo X90 Pro+ च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. जो फोन कंपनीचा सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड स्मार्टफोन असू शकतो.

Vivo X90 Pro+ 5G गिकबेंचवर लिस्ट

विवो एक्स90 प्रो प्लस 5जी फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर गेल्या 10 नोव्हेंबरला लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमध्ये खुलासा झाला आहे की हा विवो स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो जो 3.19गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या प्रोसेसरसह काम करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये सर्वात लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएस असल्याचा खुलासा झाला आहे तसेच गीकबेंचवर हा विवो मोबाइल 12 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हे देखील वाचा: स्कूटर नव्हे आता येतेय Ola Electric Bike! फुल चार्जमध्ये मिळू शकते अविश्वसनीय रेंज

Vivo X90 Pro Plus च्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅम दिली जाऊ शकतो तसेच हा स्मार्टफोन अन्य व्हेरिएंट्समध्ये देखील लाँच होऊ शकतो. बेंचमार्किंग स्कोर पाहता विवो एक्स90 प्रो+ ला सिंगल-कोर मध्ये 1485 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये Vivo X90 Pro+ 5G स्मार्टफोनला 4739 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे. लीकनुसार विवो एक्स90 प्रो प्लस मध्ये 80वॉट फास्ट चार्जिंग तसेच 50वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते. हे देखील वाचा: 16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X90 Pro+ Camera

विवो एक्स90 प्रो प्लस 5जी फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता हा स्मार्टफोन खूप पावरफुल कॅमेरा मॉड्यूलसह येऊ शकतो. Vivo X90 Pro+ च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX989 Carl ZEISS + 48MP Sony IMX598 ultra-wide lens + 50MP Sony IMX578 portrait lens + 64MP OmniVision OV64B periscope zoom कॅमेरा सेन्सर्स मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इस मोबाइल फोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here