Vivo Y17 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स

91मोबाईल्स ने गेल्या आठवड्यातच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि वीवो द्वारा भारतात वाई सीरीज अंतर्गत Vivo Y17 फोन लॉन्च केला जाईल. आता हा फोन ऑफिशियली सादर करण्यात आला आहे. फोन कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर लिस्ट आहे, जिथे डिवाइसचे सर्व स्पेसिफिकेशन्स दिसत आहेत. पण वेबसाइट वर फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Vivo Y17 ची किंमत आणि उपलब्धता
Vivo ने आतापर्यंत ऑफिशिली भारतातील Y17 ची किंमत आणि उपलब्धते बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण IndiaShopps च्या एका रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि डिवाइस 17,990 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल. डिवाइस दोन कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: जियो करणार आहे धमाका, 600 रुपयांमध्ये देईल महिनाभर लँडलाइन, ब्रॉडबॅंड आणि टीवीचा कॉम्बो

वीवो Vivo Y17 ची डिजाइन
Vivo Y17 कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या वरच्या पॅनल वर ‘यू’ शेप नॉच देण्यात येईल. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट दिला जाईल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. या कॅमेरा सेटअप खाली फ्लॅश लाईट असेल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट असेल.

वीवो Vivo Y17 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y17 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Redmi Y3 आणि Redmi 7 भारतात लॉन्च, Xiaomi पुन्हा करणार नवीन रेकॉर्ड

फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13-मेगापिक्सल एफ/2.2 प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल एफ/2.2 सुपर वाइड-एंगल थर्ड सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 20-मेगापिक्सल शूटर एफ/2.0 अपर्चर आहे. तसेच Vivo Y17 एंडरॉयडच्या नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here