Vivo कंपनी पुढल्या महिन्यात भारतात आपल्या ‘वी20 सीरीज’ चा शानदार स्मार्टफोन Vivo V20 Pro लॉन्च करणार आहे जो 5G कनेक्टिविटी सह येईल. या पावरफुल मोबाईलच्या भारतातील लॉन्चच्या आधी वीवो एक स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Vivo Y1s भारतात लॉन्च केला आहे. हा फोन फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो Jio च्या लॉक इन ऑफर सह पण विकत घेता येईल.
Vivo Y1s
वीवो वाय1एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा लो बजेट फोन प्लास्टिक बॉडी वर लॉन्च झाला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. वीवो वाय1एस 88.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.
Vivo Y1s अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 10.5 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आहे. भारतीय बाजारात हा फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची मेमरी वाढवता येईल.
हे देखील वाचा : Exclusive: Vivo V20 Pro 5G च्या भारतीय किंमतीचा झाला खुलासा, जाणून घ्या किंमत
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y1s च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. वीवो वाय1एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 135.11 x 75.09 x 8.28एमएम तसेच वजन 161ग्राम आहे.
Vivo Y1s बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी Vivo Y1s स्मार्टफोन 4,030एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन Aurora Blue आणि Olive Black कलर मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 7,990 रुपये आहे. युजर्स Vivo Y1s Jio च्या lock-in offer सह पण विकत घेऊ शकतील ज्यात 4550 रुपयांचे फायदे मिळतील.