6,000mAh बॅटरी, 12 जीबी रॅम असणारा Vivo Y200 GT, Y200t स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

विवोने आपल्या वाय सीरिजचा विस्तार करत चीनमध्ये Vivo Y200 GT आणि Vivo Y200t मोबाईल लाँच केला आहे. दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप, 6,000mAh ची मोठी बॅटरी, 12 जीबी रॅम, 512GB पर्यंत इंटरनल स्टोरज सारखे अनेक फिचर्स आहेत. चला, पुढे संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.

Vivo Y200 GT चे स्पेसिफिकेशन

 • डिस्प्ले: Vivo Y200 GT फोनमध्ये 6.78-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे यावर 1.5K रिजॉल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट मिळतो.
 • प्रोसेसर: मोबाईलमध्ये परफॉरमेंससाठी ब्रँडने क्वॉलकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट लावली आहे.
 • स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि 512 जीबी पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज आहे.
 • कॅमेरा: Vivo Y200 GT च्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स लावली आहे. तसेच, डिव्हाईसमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
 • बॅटरी: Vivo Y200 GT मध्ये दमदार 80W फास्ट चार्जिंगसह 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
 • इतर: सुरक्षेसाठी डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी-सी पोर्ट सारखे अनेक फिचर्स आहेत.
 • ओएस: Vivo Y200 GT मोबाईल अँड्रॉईड 14 आधारित ओरिजिनओएस 4 वर चालतो.
 • वजन आणि डायमेंशन: विवोच्या नवीन फोनचे डायमेंशन 163.72 x 75.88 x 7.98 मिमी आणि वजन 194 ग्रॅम आहे.

Vivo Y200t चे स्पेसिफिकेशन

 • डिस्प्ले: Vivo Y200t फोनमध्ये 6.72-इंचाचा IPS LCD पॅनल देण्यात आला आहे यावर FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.
 • प्रोसेसर: डिव्हाईसमध्ये युजर्सना स्मूद अनुभवसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट सादर करण्यात आला आहे.
 • स्टोरेज: हा मोबाईल 12 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि 512 जीबी पर्यंत UFS 2.2 स्टोरेज इंटरनलसह आहे.
 • कॅमेरा: Vivo Y200t मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर रिअर साईड मध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सल डेप्थ लेन्स लावली आहे.
 • बॅटरी: डिव्हाईसमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
 • इतर: सिक्योरिटीसाठी यात साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम, 5जी, 4 जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 यूएसबी-सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडियो जॅक आहे.
 • वजन आणि डायमेंशन: Vivo Y200t चे डायमेंशन 165.7 x 76 x 7.99 मिमी आणि वजन 199 ग्रॅम ठेवले आहे.

Vivo Y200t आणि Vivo Y200 GT ची किंमत

 • Vivo Y200t आणि Vivo Y200 GT फोन चीनमध्ये चार स्टोरेज मध्ये आणला गेला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज, 8GB रॅम+256GB स्टोरेज, 12GB रॅम+256GB स्टोरेज आणि 12GB रॅम+512GB स्टोरेजचा समावेश आहे.
 • Vivo Y200t च्या बेस मॉडेलची किंमत 1,199 युआन म्हणजे जवळपास 13,807 रुपये, दुसरे मॉडेल 1,299 युआन जवळपास 14,958 रुपये, मिड मॉडेल 1,499 युआन जवळपास 17,597 रुपये आणि टॉप ऑप्शन 1,699 युआन जवळपास 19,565 रुपयांचा आहे. हा किंगशान (ब्लू) आणि ऑरोरा (ग्रीन) मध्ये उपलब्ध होईल.
 • Vivo Y200 GT फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन जवळपास 18,413 रुपये, दुसरा 1,799 युआन जवळपास 20,717 रुपये, तिसरा 1,999 युआन जवळपास 23,020 रुपये आणि टॉप ऑप्शन 2,299 युआन जवळपास 26,474 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा स्टॉर्म आणि थंडर सारख्या दोन कलरमध्ये विकला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here