सर्वांपेक्षा जबरदस्त BSNL चा ‘हा’ स्वस्त प्लॅन! 3300GB डेटा सह मिळेल फ्री कॉलिंग

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नं आपल्या प्रीपेड ग्राहकांसोबत ब्रॉडबँड युजर्सचा विचार करून एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. कंपनीनं 499 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे, जो फायबर बेसिक प्लॅन (Fiber Basic plan) नावानं बाजारात आला आहे. कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणं ही या प्लॅनची सर्वात मोठी खासियत आहेत. परंतु इथे एक बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की सरकारी टेलीकॉम कंपनीनं आपल्या फायबर बेसिक प्लॅनची किंमत 449 रुपयांवरून 499 केली आणि 449 रुपयांच्या प्लॅनचं नाव बदलून फायबर बेसिक नियो (Fiber Basic Neo) केलं आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते बेनिफिट्स मिळत आहेत.

बीएसएनएल 499 रुपयांचा फायबर बेसिक ब्रॉडबँड प्लॅन

डाटा: BSNL चा नवीन फायबर बेसिक प्लॅन 3.3TB पर्यंत FUP डेटा (3300GB Data) सह येतो. प्लॅनची खासियत म्हणजे जर ग्राहकांनी आपल्या बिलिंग डेट पर्यंत 3300GB डेटा वापरला नसेल तर स्पीड कमी होत नाही. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 3.3TB डेटासाठी 40Mbps स्पीड मिळतो जो डेटा संपल्यावर कमी होऊन 4Mbps होईल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड स्मार्टफोनची तयारी अंतिम टप्प्यात; दमदार फीचर्ससह येतोय Vivo X90 Pro+ 5G

अनलिमिटेड कॉलिंग: बीएसएनएल या प्लॅनसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील देत आहे. म्हणजे तुम्ही प्लॅनसह डेटा व्यतिरिक्त कोणत्याही नंबरवर कितीही वेळ मोफत बोलू शकता.

मिळेल 90 टक्के डिस्काउंट

कंपनीनं गेल्या काही दिवसांपासून एक भन्नाट ऑफर सुरु केली आहे. या ऑफर अंतगर्त ग्राहकांना या ब्रॉडबँड प्लॅनच्या पहिल्या महिन्यासाठी 500 रुपयांपर्यंत 90 टक्के सूट देखील मिळत आहे. हे देखील वाचा: स्कूटर नव्हे आता येतेय Ola Electric Bike! फुल चार्जमध्ये मिळू शकते अविश्वसनीय रेंज

BSNL 449 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

बीएसएनएलच्या 449 रुपयांच्या Fibre Basic NEO ब्रॉडबँड प्लॅन बद्दल बोलायचं तर यात 30Mbps स्पीडसह 3.3TB मंथली डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये पण FUP लिमिट संपल्यावर प्लॅनचा स्पीड 4Mbps पर्यंत कमी होतो. इतकेच नव्हे तर या प्लॅनमध्ये देखील पहिल्या बिल वर 90 टक्के (500 रुपयांपर्यंतचा) डिस्काउंट मिळेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here