Categories: बातम्या

शाओमी ला टक्कर देण्यासाठी वीवो ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन वाय53आय, किंमत 7,990 रुपये

चीनी टेक कंपनी वीवो ने मागच्याच आठवड्यात आपल्या नॉच डिसप्ले वाल्या स्मार्टफोन वी9 चा अजून एक नवीन मॉडेल वीवो वी9 यूथ नावाने भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या फोन ची किंमत कंपनी ने 18,990 रुपये ठेवली आहे. या मोठ्या स्मार्टफोन सोबतच वीवो ने आपला दुसरा स्वस्त स्मार्टफोन वीवो वाय53आय पण भारतीय बाजारात सादर केला आहे. वीवो ने वाय53आय आॅफलाईन बाजारात आणला आहे, हा फोन 7,990 रुपयांच्या किमतींवर सेल साठी उपलब्ध आहे.

5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च, शाओमी शी होईल सरळ टक्कर

वीवो वाय53आय चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता प्राप्त माहिती नुसार हा फोन प्रीमियम यूनिबॉडी डिजाईन वर सादर करण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 960 × 540 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5-इंचाचा डिसप्ले देण्यात आला आहे. वीवो च्या या फोन चा एंडरॉयड वर्जन जुना आहे. हा फोन एंडरॉयड मार्शमेलो आधारित आहे त्याचबरोबर क्वॉड-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने वीवो वाय53आय मध्ये 2जीबी च्या रॅम मेमोरी सह 16जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवीता येते. फोटोग्राफी साठी फोन मध्ये बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

फक्त 49 रुपयांमध्ये एयरटेल देत आहे 3जीबी 4जी डेटा

वीवो वाय53आय डुअल सिम फोन आहे आणि 4जी वोएलटीई सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स असलेल्या या स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही पण रिपोर्ट वरून असे समोर येत आहे की या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,500एमएएच ची बॅटरी आहे. वीवो वाय53आय रिटेल स्टोर्स वरून 7,990 रुपयांच्या किंमतींवर विकत घेता येईल.

Published by
Kamal Kant