4जीबी रॅम आणि 6.22-इंचाच्या नॉच डिसप्ले सह लॉन्च झाला वीवो वाय83, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

टेक कपंनी वीवो ने मागच्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर नवीन डिवाईस वाय83 सादर केला होता. वीवो वाय83 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. आपला हा शानदार स्मार्टफोन कंपनी ने आता भारतीय बाजारात पण लॉन्च केला आहे. वीवो ने वाय83 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो वाय83 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील लेटेस्ट चिपसेट आहे. मीडियाटेक ने काही काळापूर्वी हेलीयो पी22 चिपसेट सादर केला होता आणि वीवो वाय83 पहिला असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह लॉन्च झाला आहे. हेलीयो पी22 चिपसेट फास्ट प्रोसेसिंग सह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्निक वर खास काम करतो. वीवो वाय83 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण अॅप्पल आयफोन प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे.

वीवो वाय83 मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.22-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.0 आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कपंनी कडून या फोन मध्ये 4जीबी चा रॅम देण्यात आला आहे. हा फोन 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वाय83 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक देण्यात आली आहे तर पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here