4जीबी रॅम आणि 24-एमपी कॅमेरा सह वीवो झेड10 झाला भारतात लॉन्च

वीवो ने जुलैच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन झेड10 ची घोषणा केली होती. फोन सादर करून वीवो ने याचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले होते पण झेड10 ची किंमत सांगितली नव्हती. आज वीवो कंपनी ने हा मीड बजेट फोन आॅफिशियली बाजारात आणला आहे. वीवो ने झेड10 स्मार्टफोन 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन खासकरून आॅफलाईन रिटेल चेन मार्फत मार्केट मध्ये येईल जो सध्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू च्या रिटेल स्टोर्स वर विकला जाईल.

वीवो झेड10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन सह सादर करण्यात आला आहे ज्यात 1440×720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा एचडी आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड नुगट आधारित फनटच 3.2 ओएस वर सादर करण्यात आला आहे तसेच हा 1.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. ग्राफिक्स साठी फोन मध्ये ऐड्रेनो 506जीपीयू आहे.

वीवो ने या फोन ला 4जीबी रॅम मेमरी सह सादर केले आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर फ्लॅश लाईट सह 24-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.

वीवो झेड10 डुअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह 3,225एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो झेड10 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आगामी काळात हा फोन देशातील इतर शहरांमध्ये पण सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here