लॉन्चच्या आधीच समोर आले Vivo Z5 चा संपूर्ण तपशील, बघा खरा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Z5x च्या यशानंतर आता कंपनी हि सीरीज अजून वाढवणार आहे. कंंपनीने यःची अधिकृत घोषणा केली आहे कि Vivo येत्या 31 जुलैला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ‘झेड सीरीज’ चा आगामी स्मार्टफोन Vivo Z5 टेक मार्केट मध्ये सादर केला जाईल. Vivo Z5 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. तर आता Vivo Z5 च्या लॉन्चच्या आधीच या स्मार्टफोनची खरी ईमेज पण इंटरनेट वर वायरल झाली आहे.

Vivo Z5 चे हे फोटोज चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केले गेले आहेत. या फोटोज मध्ये फोन बॉक्स सोबत याचा फ्रंट आणि बॅक पॅनल पण दाखवण्यात आला आहे. Vivo Z5 च्या खऱ्या फोटोज वरून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. आतापर्यंत चर्चा अशी होती कि Vivo Z5 पंच होल डिस्प्ले वर सादर होईल पण या फोटोज वरून स्पष्ट झाले आहे कि वीवो आपल्या झेड सीरीजच हा आगामी डिवाईस वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वरच लॉन्च करेल.

Vivo Z5 डिजाईन

वीवो झेड5 फोटोज मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोटोज मध्ये Vivo Z5 ग्लॉसी पॅनल सह दाखवण्यात आला आहे. फोनचा बॅक पॅनल पाहता त्यावर ट्रिपल रियर कॅमेरा आहे. हा कॅमेरा सेटअप पॅनलच्या डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मधेच फ्लॅश लाईट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर Vivo चा पर्सनल असिस्टेंट बटण आहे. तसेच खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.

Vivo Z5 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार Vivo Z5 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल ज्यात 6.38 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असेल. बोलले जात आहे कि Vivo Z5 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येईल ज्यात डिस्प्ले वर टच केल्यावर फोन अनलॉक होईल. लीकनुसार Vivo Z5 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस यूआई वर सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Huawei Nova 5i Pro, 8जीबी रॅम सह आहे 4000एमएएच बॅटरी

Vivo Z5 बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट दिला जाऊ शकतो. चर्चा अशी आहे कि कंपनी हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते. या वेरिएंट्स मध्ये एक मॉडेल 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी दिली जाऊ शकते. बोलले जात आहे कि Vivo Z5 कंपनी मल्टीटर्बो टेक्नोलॉजी सह सादर करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक्सनुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. या सोबतच Vivo Z5 च्या बॅक पॅनल वर 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला जाऊ शकतो आणि यात 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर मिळू शकतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Vivo Z5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 4GB रॅम आणि 4030mAh बॅटरी वाले Oppo A7 ची किंमत पुन्हा झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Z5 4500एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन बद्दल बोलले जात आहे कि हा पर्पल, ब्लॅक आणि ग्रेडिएंट व्हाईट कलर वेरिएंट मध्ये बाजारात येईल. पण Vivo Z5 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 31 जुलैची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here