Vivo ने काही दिवसांपूर्वी अधिकृत पणे घोषणा केली होती कि कंपनी लवकरच अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला नवीन 5जी फोन सादर करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव Vivo Z6 5G सांगण्यात आले होते. त्यानुसार आज वीवोने आपला हा फोन सादर केला आहे. Vivo Z6 5G स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. हा डिवाईस मीड बजेट मध्ये आला आहे जो शानदार लुक सोबत हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतो. चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर आशा आहे कि आगामी काही दिवसांत Vivo आपला हा नवीन फोन इतर बाजारांत पण सादर करेल.
Vivo Z6 5G
वीवो झेड6 5जी 91.74 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन मध्ये बेजल लेस स्क्रीन देण्यात आली आहे जिच्या उजवीकडे पंच-होल आहे. वीवो झेड6 5जी मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.57 इंचाचा फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. Vivo Z6 5G एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 10 वर चालतो.
Vivo Z6 5G चीनी बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. हा फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.1 storage ला सपोर्ट करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे जो डुअल-मोड 5जी मोड सह येतो.
हे देखील वाचा: 4000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 2 जीबी रॅम सह लॉन्च झाला HTC चा लो बजेट फोन Wildfire R70
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Z6 5G क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेेंसर देण्यात आला आहे जो 6पी लेंस सह येतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.22 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी वीवो झेड6 5जी मध्ये एफ/2.48 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo Z6 5G एक डुअल सिम फोन आहे. फोन मध्ये गेमिंग परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी कंपनीने हा Multi-Turbo 3.0 आणि Game Space 3.0 सारख्या फीचर्स सह येतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Vivo Z6 5G मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 44वॉट सुपरफ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: Black Shark 3 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर, 12जीबी रॅम आणि 65वॉट चार्जिंग सपोर्ट सह असेल स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट
वीवोने Vivo Z6 5G स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 2,298 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 23,600 रुपयांच्या आसपास आहेत. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट 2,598 युआन मध्ये आला आहे ज्याची किंमत इंडियन करंसीनुसार 26,800 रुपयांच्या आसपास आहे. Vivo Z6 5G चीनी बाजारात Ice Age, Interstellar Silver आणि Aurora Black कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.















