याबाबतीत Airtel आणि Jio पेक्षा खूप पुढे आहे Vodafone Idea, जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट

पुन्हा एकदा कॉल क्वालिटीच्या बाबतीत Vodafone Idea ने देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी रिलायंस जियोला मागे टाकण्याचे काम केले आहे. Vodafone Idea नोव्हेंबर मध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात चांगली रेटिंग कॉल क्वालिटी मध्ये मिळाली आहे. याची माहिती टेलीकॉम रेगुलेट्री अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) द्वारे शेयर करण्यात आलेल्या नवीन रिपोर्ट मध्ये समोर आली आहे. पण असे होण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण Vi ने हि कमाल करून दाखवली आहे.

ट्रायच्या वेबसाइट वरील युजर डेटा सर्व नेटवर्क टाइप द्वारे जनरेट केला गेला आहे, ज्यात 2जी, 3जी आणि 4जी चा समवेश आहे. रिपोर्टनुसार वॉयस क्वालिटीच्या बाबतीत Vi सर्वात चांगली आहे. TRAI ने हा डेटा MyCall Dashboard वर शेयर केला आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि आयडियाला कॉल क्वालिटीच्या बाबतीत 5 पैकी 4.9 रेटिंग मिळाली आहे, त्यामुळे ती टॉपला आहे. तर वोडाफोनला 5 पैकी 4.6 रेटिंग मिळाली आहे. तसेच बीएसएनएलने 5 पैकी 4.1 रेटिंग मिळवली आहे. तर एयरटेल आणि रिलायंस जियोला 5 पैकी 3.8 रेटिंग मिळाली आहे.

आउटडोर कॉल क्वालिटी मध्ये वोडाफोन सर्वात पुढे

इंडोर कॉल क्वालिटीच्या बाबतीत वोडाफोनला 4.6 रेटिंग मिळाली आहे, तर आउटडोर कॉल क्वालिटी मध्ये कंपनीला 4.3 रेटिंग मिळाली आहे. तर दुसरीकडे आयडियाला इंडोर 4.9 रेटिंग मिळाली आहे तर आउटडोर 4.8 रेटिंग मिळाली आहे. एयरटेलला 3.9 आणि 3.5, बीएसएनएलला 3.9 आणि 4.3 व जियोला 3.9 आणि 3.6 रेटिंग मिळाली आहे.

विशेष म्हणजे ऑक्टोबर मध्ये समोर आलेल्या ट्रायच्या रिपोर्ट मध्ये बीएसएनएल कडे 3.4 / 5 फीडबॅक रेटिंग, रिलायंस जियो आणि वोडाफोन 3.3 रेटिंग आणि एयरटेलला 3.0 स्टार रेटिंग मिळाली होती. या महिन्यात युजर्स कडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावर BSNL वॉइस कॉल क्वालिटीच्या बाबतीत पहिल्या नंबर वर होती.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here