Kantara Hindi OTT: हिंदीतून घेता येणार कांताराचा अभूतपूर्व अनुभव; रिलीज डेट आली समोर

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचं दर्शन घडवणारा Kantara चित्रपट भारतभर गाजला आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध झाला होता, परंतु प्राइमवर हा चित्रपट मूळ Kannada सह Malayalam, Tamil आणि Telugu भाषेत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ज्यांना या दाक्षिणात्य भाषा समजत नाहीत त्यांना या चित्रपटाचा अनुभव घेता आला नाही. मोठ्या प्रमाणावरील दर्शक Kantara Hindi OTT ची वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण कांतारा लवकरच Netflix वर हिंदीतून स्ट्रीम करता येईल.

Kantara Hindi OTT

जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींची कमाई करण्याचा विक्रम करणारा कांतारा चित्रपटाचं हिंदी डब व्हर्जन आता ओटीटीच्या माध्यमातून दर्शकांच्या भेटीला येत आहे. कांतारा हिंदी लोकप्रिय ओटीटी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 9 डिसेंबर, 2022 पासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अपकमिंग सेक्शनमध्ये देखील स्पॉट करण्यात आला आहे.

kantara-hindi-ott-release-date-watch-rishab-shetty-starrer-blockbuster-on-netflix-december-9

ओटीटीवर रिलीज झाला कांतारा

‘कांतारा’ च्या ओटीटी रिलीज डेटची वाट बघत असलेल्या दर्शकांसाठी खुशखबर आली आहे कारण हा दाक्षिणात्य चित्रपट 24 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम करता येईल. तुम्ही प्राइम व्हिडीओच्या सब्सक्रिप्शनसह हा चित्रपट बघू शकता.

चित्रपट कांताराच्या ओटीटी रिलीज डेट बद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत होती. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अ‍ॅक्टर ऋषभ शेट्टी यांनी स्पष्ट केलं होतं की चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा अधिकृतपणे होईल तेव्हाच त्यावर विश्वास ठेवा. आता प्राइम व्हिडीओ सोबतच ऋषभ शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर याच्या ओटीटी डेटची घोषणा केली आहे.

इथे पाहा चित्रपटाचा ट्रेलर

कांताराची गोष्ट

‘कांतारा’ चित्रपटाची गोष्ट दक्षिण भारतातील रूढी, परंपरा आणि पिढ्यानपिढ्या गुपित राहिलेल्या रहस्यांभोवती फिरते. यात दाखवण्यात आलं आहे की एका राजाने देव म्हणून पुजल्या जाणाऱ्या एका दगडाच्या बदल्यात आपली जमीन गावकऱ्यांना दिली कारण त्याला मनःशांती हवी असते. परंतु कालांतराने राजाच्या वंशजांना ती जमीन परत हवी असते, तशी मागणी देखील ते गावकऱ्यांकडे करतात. दुसरीकडे देवाने राजाला जमीन परत मागितल्यास भोगाव्या लागणाऱ्या परिणांमाची माहिती दिली होती. तसे परिणाम देखील दिसू लागतात. ही गोष्ट राजाचे वंशज, गावकरी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्यातील संघर्षाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here