CES 2023 मधून दिसली Volkswagen ID.7 ची झलक; पाहा फोटो

जगातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी इव्हेंट CES 2023 ला सुरुवात झाली आहे. या नवीन इव्हेंटच्या मीडिया प्रीव्यूच्या दिवशी जगासमोर एक दीर्घ रेंज असलेली इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे. Volkswagen नं लास वेगास, यूएसमध्ये सुरु असलेल्या इव्हेंट दरम्यान आपली इलेक्ट्रिक सीडॅन, ID.7 सादर केली आहे. ही कार कंपनीनं इलेक्ट्रोल्यूमिनेसेंस पेंट कव्हरसह प्रदर्शित केली आहे. ID.7 फॉक्सवॅगनचा पहिला इलेक्ट्रिक सीडॅन मॉडेल आहे, जो कंपनीनं इलेक्ट्रिक ऑटो मार्केटमध्ये सादर केला आहे.

Volkswagen ID.7 चा लुक

कंपनीनं Volkswagen ID.7 ब्रँडच्या MEB प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आला आहे. लुक व डिजाइन पाहता यात आकर्षक बोनट, अ‍ॅडॅप्टिव प्रोजेक्टर LED हेडलाइट्स, स्लोप असलेलं छत आणि रेक विंडस्क्रीन सोबतच VW लोगो सह गाडी इतकीच रुंद DRL आहे. या कारमध्ये ORVMs, फ्लेयर्ड वील आर्चसह शानदार अलॉय वील्स देण्यात आले आहेत. रियर लुक पाहता यात मागे रॅप-अराउंड LED टेललाइट्स आणि नवीन डिजाइनचा बम्पर दिसतो. हे देखील वाचा: मराठी युट्युबरचं OTT वर दणक्यात पदार्पण; ‘ऊंचाई’ सह या आठवड्यात हे चित्रपट आणि सीरिज रिलीज

Volkswagen ID.7 ची डिजाइन

वरील फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता की फॉक्सवॅगन ID.7 मध्ये शानदार डॅशबोर्ड डिजाइन, हेड-अप डिस्प्ले सोबतच मल्टी-कलर एम्बिएंट लाइट पण देण्यात आली आहे. यामुळे या कारचा इंटरियर आणखी शानदार बनतो. तसेच यात ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल आणि मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील मिळतो.

या Volkswagen ID.7 च्या केबिनमध्ये 15 इंचाची टच स्क्रीन, फ्लॅशिंग टॉर्च स्लाइडर, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हेड-अप डिस्प्ले आहे. डिजिटली नियंत्रित एअर व्हेंट्स आहेत जे बाहेरील वातावरणावर अवलंबून कारच्या आत तापमान स्वयंचलितपणे समायोजित करतात. ही नवी सीडॅन 194.6 इंच लांब आहे, हीचा व्हीलबेस 116.9 इंच आहे.

फीचर्स आणि किंमत

सध्या फॉक्सवॅगन ID.7 ची टेक्निकल फीचर्सची माहिती कंपनीनं शेयर केली नाही. परंतु कंपनीनं एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की सिंगल चार्जमध्ये ही ई-कार 700 किलोमीटर पर्यंतची रेंज देईल. तसेच पॅसेंजर्सच्या सुरक्षेसाठी यात मल्टीपल एयरबॅग आणि ADAS सेफ्टी फीचर्स मिळतील. हे देखील वाचा: 15 हजारांच्या रेंजमध्ये दणकट 5G Phone; दर्जेदार कॅमेऱ्यासह Redmi Note 12 5G फोन भारतात लाँच

कंपनीनं CES 2023 दरम्यान Volkswagen ID.7 च्या प्राइस आणि सेलबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. लवकरच सर्व फीचर्सचा खुलासा केल्यानंतर या घोषणा केल्या जातील. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार ID.4 ची प्राइस $37,495 (जवळपास 31.06 लाख रुपये) पासून सुरु होऊ शकते आणि लवकरच ही ई-कार उत्तर अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here