भारतात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp शानदार फीचर्स सह येतो. आता फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सऍप यूजर्ससाठी चांगले फीचर्स घेऊन येत असते, ज्यामुळे यूजर्सना चॅटिंग करणे अजून सोप्पे होते. कंपनी एका कमालीच्या फीचर वर काम करत आहे, ज्यामुळे एकच नंबर अनेक फोन्स मध्ये व्हॉट्सऍप वापरण्याची सुविधा मिळेल. कंपनी अनेक दिवसांपासून मल्टी-डिवाइस सपॉर्ट फीचर वर काम करत आहे. WABetaInfo ने या फीचरची माहिती दिली आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स चार डिवाइसेज एकाच अकाउंटशी लिंक करू शकतील.
मल्टीपल डिवाइस सपोर्ट आधीच्या ‘व्हॉट्सऍप फॉर वेब’ फीचर पेक्षा वेगळा असेल. नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स एकाच व्हॉट्सऍप अकाउंट मध्ये लॉग-इन करून एकाच वेळी एकापेक्षा जास्त डिवाइसेस मध्ये वापरू शकतील. एकदा लॉग इन केल्यावर दुसऱ्या डिवाइस वर सोशल मेसेजेइंग ऍप वापरण्यासाठी प्राथमिक डिवाइसची गरज लागणार नाही. हि सुविधा आतापर्यंत उपलब्ध नव्हती.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना ऍप मध्ये ‘Linked Devices’ चा ऑप्शन मिळेल. यात दिसेल यूजर कोणत्या डिवाइस मध्ये त्या नंबरचा व्हॉट्सऍप वापरात आहे. हा नवीन सेक्शन ऍपच्या मेन्यू दिला जाईल जो टॉप राइट मध्ये असलेल्या तीन डॉट्स वर टॅप केल्यावर समोर येईल.
तसेच नवीन अपडेट मध्ये ‘Advanced Search Mode’ पण असेल जो यूजर्सना व्हॉट्सऍप ऍप मध्ये एक ठराविक मेसेज शोधण्यास मदत करेल. हा मोड आधी व्हॉट्सऍप 2.20.117 एंड्रॉइड बीटा चेंज मध्ये पण दिसला होता.
रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि, “या फीचर्स वर अजूनही काम चालू आहे आणि सध्या हे उपल्बध नाहीत.” नवीन व्हॉट्सऍप फीचर पूर्णपणे विकसित केल्यावर हा यूजर्ससाठी सादर केला जाईल. तसेच मागच्या एंडरॉयड बीटा वर्जन मध्ये ऍपची प्राइमरी रजिस्ट्रेशन स्क्रीन दिसली होती आणि वाई-फाईच्या मदतीने लॉगइन करण्यास सांगण्यात आले होते.















