10 हजारांच्या बजेटमध्ये स्वस्त आणि मस्त फोन; POCO C50 याच महिन्यात येणार भारतीयांच्या भेटीला

POCO C50 India Launch: शाओमीच्या सब ब्रँड POCO नं अल्पावधीत चांगला चाहतावर्ग कमवला आहे. आपल्या हटके थीम, टायटल्स व इमेजमुळे तरुण स्मार्टफोन युजर्स दरम्यान पोको फोनची लोकप्रियता दिसून येते. आपल्या अशाच फॅन्सना भेट देत पोको इंडियानं आज घोषणा केली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘सी’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन POCO C50 लाँच करणार आहे. पोको सी50 लो बजेट मोबाइल फोन असेल जो या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होईल.

POCO C50 Launch in India

पोको इंडियानं माहिती दिली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत आहे त्यामुळे लवकरच C-series चा नवीन स्मार्टफोन POCO C50 लाँच केला जाईल. पोकोनं अजूनतरी ठराविक लाँच डेट सांगितली नाही परंतु कंपनीनं स्पष्ट सांगितलं आहे की पोको सी50 स्मार्टफोन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात भारतात लाँच होईल. कंपनीनं हे देखील सांगितलं आहे की POCO C50 एक budget smartphone असेल. त्यामुळे आशा आहे की पोको सी50 चा बेस व्हेरिएंट 10 हजारांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. हे देखील वाचा: आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम

POCO C40

Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1560 x 720 पिक्सल, रिफ्रेश रेट 60Hz आणि ब्राइटनेस 400 निट्स आहे. पोकोच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. त्याचबरोबर डिस्प्ले Corning Gorilla Glass प्रोटेक्शनसह येतो. Poco C40 स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये JLQ JR10 SoC सह सादर करण्यात आला होता जो Android 11 आधारित MIUI वर चालतो.

Poco C40 स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. तसेच फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: भन्नाट! 12 हजारांच्या आत Samsung चा 12GB RAM असलेला 5G Phone; पुन्हा मिळणार नाही अशी संधी

कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G, ड्युअल बँड WiFi, Bluetooth 5.0, GNSS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5mm हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Poco C40 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh च्या बॅटरीसह 18W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here