UPI One World काय आहे? जाणून घ्या कोणाला किती होईल फायदा

भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अशा प्रवाशांसाठी यूपीआय वन वर्ल्ड (UPI One World) लाँच केले आहे. हे एक नवीन डिजिटल वॉलेट आहे, ज्याद्वारे देशात कुठेही पेमेंट करता येते. चांगली गोष्ट म्हणजे हे वॉलेट भारतीय सिम कार्ड किंवा भारतीय बँक खात्याशिवाय युपीआय पेमेंट करण्याची सुविधा देत आहे. हे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या सुविधेनंतर भारतात येणाऱ्या पर्यटकांना रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. तसेच, ते परकीय चलनाचा व्यवहार न करता भारतभर प्रवास करू शकतील.

वन वर्ल्ड युपीआय काय आहे?

वन वर्ल्ड युपीआय वॉलेट (One World UPI wallet) गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये G20 इंडिया शिखर संमेलनाच्या दरम्यान सादर करण्यात आले होते. ते आता लाँच करण्यात येत आहे. हे एक प्रीपेड वॉलेट आहे, जे प्रवाशांना सहज पैसे पाठवण्याची सुविधा देते. एवढेच नाही तर झिरो ट्रांजेक्शन आणि ऑनबोर्डिंग शुल्कासह पैशांची देवाणघेवाण करण्याचा त्रासही ते दूर करते.

वन वर्ल्ड यूपीआय शी कनेक्ट होण्यासाठी वापरकर्त्यांना KYC प्रक्रियेचे पालन करावे लागेल, ज्यासाठी पासपोर्ट, व्हिसा आणि आंतरराष्ट्रीय फोन नंबर यासारखे तपशील आवश्यक आहेत. हे NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शनाखाली IDFC फर्स्ट बँक आणि ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या सहकार्याने सुरू केले आहे. ही डिजिटल पेमेंट प्रणाली प्रवाशांना कॅशलेस व्यवहाराची सुविधा देते. स्वारस्य असलेले प्रवासी निवडक विमानतळ आणि व्यापारी स्टोअरमधून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

वन वर्ल्ड युपीआय वॉलेटमध्ये पैसे कसे लोड करायचे?

वन वर्ल्ड युपीआय वॉलेट मध्ये पैसे लोड करणे म्हणजेच टाकणे सोपे आहे. नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून कोणीही त्यांच्या वन वर्ल्ड युपीआय वॉलेटमध्ये पैसे टाकता येऊ शकते. याव्यतिरिक्त, तुम्ही फॉरेक्स तज्ञांच्या मदतीने निवडक काउंटरवर पैशांची देवाणघेवाण देखील करू शकता. दरम्यान वॉलेटमध्ये किती पैसे लोड करता येतील याच्या मर्यादेबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

युपीआय वन वर्ल्डचा उपयोग कसा करायचा?

आंतरराष्ट्रीय प्रवासी क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्यासाठी ‘युपीआय वन वर्ल्ड’ ॲपचा वापर करू शकतात. वन वर्ल्ड युपीआय वॉलेट अधिकृत प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) जारीकर्त्यांद्वारे हॉटेल, विमानतळ, निवडक मनी एक्सचेंज आणि इतर टचपॉइंट्सवर उपलब्ध असेल. या युपीआय वन वर्ल्ड ॲपच्या मदतीने कोणताही प्रवासी कॅशफ्री प्रवास करू शकणार आहे.

स्टेप-1: सर्व प्रथम वापरकर्त्याला UPI One World ॲप डाऊनलोड करून साईन इन करावे लागेल.

स्टेप-2: नंतर पासपोर्ट, वैध व्हिसा आणि आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरच्या मदतीने KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

स्टेप-3: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय प्रवाशाला त्यांच्या आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरवर UPI वन वर्ल्ड जारी करण्यात येईल.

स्टेप-4: वापरकर्ते नंतर जारीकर्ता काउंटरवर परदेशी चलनाची देवाणघेवाण करून किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून ॲपमध्ये INR मूल्य लोड करू शकतात.

युपीआय वन वर्ल्ड वॉलेटचा काय फायदा होईल?

  • युपीआय वन वर्ल्ड वॉलेट आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अनेक फायदे देऊ शकते.
  • नवीन युपीआय वन वर्ल्ड वॉलेट ॲप प्रवाशांना फक्त QR कोड स्कॅन करून खरेदी करण्याची सुविधा देते.
    हे वॉलेट भारतात येणारा प्रत्येकजण वापरू शकतो.
  • युपीआय वन वर्ल्ड वॉलेट हे विमानतळ, हॉटेल्स आणि मनी एक्स्चेंजच्या ठिकाणी अधिकृत प्रदात्यांद्वारे जारी केले जाते, ज्यामुळे पडताळणी प्रक्रिया सुरक्षित होते.
  • प्रवासी त्यांच्या डिजिटल वॉलेट ला कॅश किंवा इतर पेमेंट पद्धतीने (इंटरनेट बँकिंग) लोड करू शकतात.
  • परकीय चलन नियमांनुसार भारत सोडल्यानंतर उर्वरित रक्कम मूळ पेमेंट स्त्रोताकडे सहजपणे हस्तांतरित केली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here