Samsung Galaxy A14 आला कंपनीच्या वेबसाइटवर; लवकरच होऊ शकतो बाजारात दाखल

Samsung Galaxy A14 5G Phone लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनचं सपोर्ट पेज लाइव्ह झालं आहे, ज्यावरून स्पष्ट झालं आहे की हा सॅमसंग स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. सॅमसंगनं अद्याप या फोन लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु सपोर्ट पेज समोर आल्यानंतर आशा आहे की काही दिवसांमध्ये Samsung Galaxy A14 5G भारतात लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A14 5G भारतीय लाँच

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर दिसलं आहे. या सपोर्ट पेजवर सॅमसंग मोबाइल फोन SM-A146B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. पेजवर फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स किंवा लाँचची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु असं सपोर्ट पेज समोर आल्यानंतर काही दिवसांमध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये सादर केला जातो. म्हणजे Samsung Galaxy A14 5G देखील लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत

Samsung Galaxy A14 5G चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन संबंधीत लीक्स व सर्टिफिकेशन्समध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच होऊ शकतो. तसेच फोनच्या भारतीय व्हर्जनमध्ये सॅमसंग एक्सनॉस चिपसेट असल्याचं देखील काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो जो वनयुआय 5.0 सह काम करू शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.

Samsung Galaxy A14 5G फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम दिली जाऊ शकते तर दुसरा व्हेरिएंट 6जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 64जीबी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: जियोला मात देण्यासाठी Airtel नं सुरु केले ‘क्रिकेट पॅक’; ओटीटी सब्सस्क्रिप्शनसह आले तीन प्लॅन

लीक्सनुसार या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A14 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. लीकनुसार, याचा प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here