Jio च्या 222 रुपयांच्या प्लॅन पेक्षा 24 रुपयांनी स्वस्त आहे हा BSNL Plan, डेटा आणि व्हॅलिडिटीमध्ये पुढे

रिलायन्स जियो (Reliance Jio) नं काही दिवसांपूर्वी जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांचा विचार करून आपला नवीन प्लॅन लाँच केला होता. कंपनीनं 222 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे ज्याला ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीच्या या डेटा प्लॅनची खूप चर्चा आहे परंतु तुम्हाला माहित आहे का या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सपेक्षा जास्त लाभ सरकारी टेलीकॉम कंपनीच्या 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिले जात आहेत. जास्त लाभ देऊन देखील BSNL चा हा प्लॅन Jio च्या प्लॅनपेक्षा 24 रुपयांनी स्वस्त आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स जेणेकरून तुम्ही योग्य प्लॅनची निवड करू शकाल.

BSNL चा 198 रुपयांच्या डेटा पॅक

बीएसएनलच्या 198 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेली लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 40 Kbps होतो. तसेच प्लॅनमध्ये 40 दिवसांची वैधता मिळते. त्यामुळे युजर्सना एकूण 80GB डेटा या प्लॅनमध्ये मिळेल. जियो प्रमाणे या रिचार्जमध्ये कोणत्याही प्रकारची कॉलिंगची सुविधा नाही. परंतु रिचार्जमध्ये Lokdhun सह Bundling of Challenges Arena Mobile Gaming Service on Progressive Web App(PWA) चा फायदा दिला जात. हे देखील वाचा: 8 हजारांच्या रेंजमध्ये 8GB रॅम असलेले फोन; 5000mAh च्या बॅटरीसह Samsung Galaxy M04 भारतात लाँच

जियोच्या प्लॅनमध्ये मिळेल 50GB डेटा

जियोचा 222 रुपयांचा हा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना 50GB डेटा दिला जात आहे. हा वनटाइम डेटा आहे, ज्याला कोणतीही डेली लिमिट नाही. तुम्ही एकाच दिवशी देखील इतका डेटा संपवू शकता किंवा संपूर्ण वैधतेत कधीही या डेटाचा वापर करू शकता. परंतु मिळालेला 50GB डेटा संपल्यावर तुमच्या इंटरनेटचा स्पीड कमी होऊन 64 Kbps होईल. हा प्लॅन बेसिक प्लॅनसह देखील वापरता येतो. डेटा व्यतिरिक्त 222 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस किंवा इतर कोणतेही बेनिफिट्स मिळत नाहीत.

निष्कर्ष

दोन्ही प्लॅनची किंमत आणि मिळणारे फायदे पाहता सरकारी कंपनी बीएसएनएलचा प्लॅन पुढे आहे. बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये 30GB डेटा जास्त मिळत आहे, तसेच 10 दिवसांची अतिरिक्त वैधता आणि अन्य बेनिफिट्स मिळतात. दुसरीकडे जियो 5G आलं आहे आहे आणि कंपनीच्या 222 रुपयांचा प्लॅनमध्ये 4G डेटा वापरता येईल. आणि बीएसएनएलकडे 4G नेटवर्क उपलब्ध नाही, त्यामुळे जास्त डेटा मिळून देखील स्पीड कमी असेल. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त आणि मस्त 5जी मोबाइल लाँच; 8GB RAM सह Vivo Y35 5G Phone ची एंट्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here