खुशखबर: लवकरच येऊ शकतो रिलायंस जियोफोन मध्ये वाईफाई हॉटस्पॉट, बघा हा वीडियो

रिलायंस नेहमीच आपल्या नवीन प्लान आणि ऑफर्सने युजर्सना सरप्राइज देते. सर्वात आधी कंपनी ने सहा महिने फ्री सेवा दिली. त्यानंतर शुल्क पण कमी ठेवले. तसेच 2017 मध्ये कपंनी ने ​जियोफोन नावाने आपला 4जी फीचर फोन लॉन्च करून युजर्सना पुन्हा एकदा मोठे सरप्रासज दिले. त्याचबरोबर कंपनी ने जियो फोनसाठी वेगळा प्लान सादर केला जो फक्त 49 ​रुपये महिन्याचा होता. या प्लान मध्ये कंपनी कॉलिंग सोबत डेटा पण देत आहे. हा फोन लोकांनी हातोहात घेतला आणि हा जगातील सर्वात जास्त विकला जाणारा फीचर फोन बनला. परंतु आत पण थोडी तक्रार केली जात होती. लोक म्हणत होते कि जियोफोन मध्ये वाईफाई हॉटस्पॉट असता तर जास्त मजा आली असती आणि असे वाटते आहे कि मुकेश अंबानी यांनी आपल्या यूजर्सचे ऐकले आहे. जी बातमी आमच्यकडे आली आहे ती बघून असे वाटत आहे कि कंपनी लवकरच वाईफाई हॉटस्पॉट सादर करणार आहे.

91मोबाईल्सला आपल्या सूत्रांकडून एक वीडियो मिळाला आहे ज्यात जियोफोन मध्ये वाईफाई हॉटस्पॉट चालू असताना दखवण्यात आला आहे. जियोफोन मध्ये हे फीचर सेटिंग मध्ये जाऊन इंटरनेट शेयरिंग मध्ये देण्यात आले आहे. या मध्ये वाईफाई हॉटस्पॉट आहे. वीडियो आल्यानंतर आम्ही पण आमचा जियोफोन अपडेट केला आणि फोन चेक केला पण हे फिचर आम्हाला अजून तरी उपलब्ध झाले नव्हते.

हा वीडियो बघितल्या नंतर आपण आशा करू शकतो कि कंपनी जियोफोन मध्ये वाईफाई टेस्ट करत आहे. नंतर हे फीचर जियोफोन यूजर्ससाठी उपलब्ध होईल. जियोफोन मध्ये हॉटस्पॉट ची वाट यूजर्स बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. कारण जियो कडे कंटेंट भरपूर आहे आणि जियोफोन मधेच अनेक ऍप आणि मीडिया कंटेंट आहे. वाईफाई हॉट स्पॉट आल्यानंतर लोक फोन मधील हाई डेफिनेशन कन्टेन्ट मोठ्या स्क्रीन वर ट्रांसफर करू शकतील. तसेच एका छोट्या फोन मधून संपूर्ण घर इंटरनेट शी जोडले जाईल जी एक मोठी गोष्ट आहे.

या वीडियो मध्ये जो फोन दाखवण्यात आला आहे. तो जियोफोनचा एफ220 मॉडेल आहे. आणि आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनी ने जियोफोन एफ90एम मॉडेल वर पण हि टेस्ट केली होती आणि त्यात पण वाईफाई हॉटस्पॉट थोड्या काळासाठी उपलब्ध होता.



कसा होईल रिलायंस जियोफोन मध्ये वाईफाई हॉटस्पॉट अपडेट
अजूनतरी हा फीचर आले नाही पण जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी फोनच्या सेटिंग मध्ये जायचे आहे.

तिथे डिवाईसची निवड करावी लागेल. डिवाइस मध्ये तुम्हाला सॉफ्टवेयर अपडेटचा ऑप्शन मिळेल. तुम्हाला हा अपडेट करावा लागेल. लक्षात ठेवा याकाळात फोन इंटरनेटशी कनेक्टड असावा. अपडेट नंतर तुमचा फोन रिस्टार्ट होईल आणि त्याचबरोबर फोन मध्ये वाईफाई हॉटस्पॉट उपलब्ध होईल.

आता वाईफाई हॉटस्पॉट ऑन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग मध्ये जावे लागेल. तिथे सर्वात खाली जाऊन तुम्हाला इंटरनेट शेयरिंगचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला वर वाईफाई हॉटस्पॉट मिळेल तो ऑन करा. अशाप्रकारे आत तुम्ही तुमच्या जियोफोनच्या नेटवर्कने दुसऱ्या फोन वर वाईफाई वापरू शकता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here