Categories: बातम्या

Xiaomi 13 Lite गुगल प्ले कन्सोलवर झाला लिस्ट; स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटचा खुलासा

Xiaomi नं गेल्या महिन्यात आपली Xiaomi 13 सीरिज चीनमध्ये सादर केली आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु आता या सीरिजमध्ये आणखी एक स्मार्टफोन येईल ज्याचे नाव Xiaomi 13 Lite असेल असं दिसतं आहे. जुन्या Xiaomi 12 Lite प्रमाणे हा स्मार्टफोन देखील मिडरेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. लाँचपूर्वीच शाओमी 13 लाइट आता गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगच्या डेटाबेसमध्ये माय स्मार्ट प्राइसला दिसला आहे.

गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमधून शाओमी 13 लाइटचं कोडनेम Ziyi असल्याचं समजलं आहे. या लिस्टिंगमधून स्पष्ट झालं आहे की हा फोन चीनमध्ये लाँच झालेल्या शाओमी सीव्ही 2 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. दोन्ही स्मार्टफोनचे रेंडर एकसारखे आहेत तसेच यात 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन व 440ppi पिक्सल डेन्सिटी असलेला डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट, 8GB RAM आणि अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमचा खुलासा लिस्टिंगमधून झाला आहे. हे देखील वाचा: De Dhakka 2 OTT Release: मनोरंजनाचा आणखी एक धक्का; दे धक्का 2 ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

चीनमधील Xiaomi Civi 2 चे स्पेसिफिकेशन्स

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता या मोबाइल फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो, जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. हा मोबाइल फोन 1000निट्स ब्राइटनेस आणि 402पीपीआयला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

Xiaomi Civi 2 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा शाओमी फोन एड्रेनो जीपीयूला सपोर्ट करतो.

शाओमी सिव्ही 2 ड्युअल सिमला सपोर्टसह बाजारात आला आहे जो 5जी टेक्नॉलॉजीवर चालतो. पावर बॅकअपसाठी इस मोबाइल फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. विशेष म्हणजे हा शाओमी फोन stainless VC liquid cooling system टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे.

शाओमी सिव्ही 2 स्मार्टफोनची मुख्य खासियत यातील सेल्फी कॅमेरा आहे. हा मोबाइल फोन 32MP + 32MP Dual Selfie Camera ला सपोर्ट करतो जे डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी ‘पिल शेप’ नॉचमध्ये देण्यात आले आहेत. दोन्ही सेल्फी सेन्सर 32 मेगपिक्सलचे ज्यात एक लेन्स एफ/2.0 अपर्चरवर चालते तर दुसरी 100डिग्री फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करणारी वाइड अँगल लेन्स आहे. विशेष म्हणजे कंपनीनं फ्रंटला देखील दोन फ्लॅश दिले आहेत. हे देखील वाचा: मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज

फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी लेन्सचा समावेश आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे.

Published by
Siddhesh Jadhav