मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज

Maruti eVX Electric SUV अखेरीस ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करण्यात आली आहे. ही ई-कार मारुती सुजुकीनं कॉन्सेप्ट मॉडेल अंतगर्त सादर केली आहे. ईवीएक्स सुजुकी बद्दल बोलायचं तर ही मिड साइज इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. त्याचबरोबर कंपनीनं या कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक दिला आहे जो फक्त एकदा चार्ज केल्यावर 550 किमी पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज देईल. चला जाणून घेऊया ई-कारची किंमत आणि इतर फीचर्स.

Maruti Suzuki ची पहिली इलेक्ट्रिक कार

महत्वाची बाब म्हणजे Maruti Suzuki ची पहिलीच इलेक्ट्रिक कार आहे. इतर ऑटो कंपन्या या नव्या सेगमेंटमध्ये आपले विविध मॉडेल्स सादर करत असताना मारुती सुझुकीनं मात्र या सेगमेंटमध्ये हजेरी लावली नव्हती. कंपनीच्या कार्सच्या मोठ्या पोर्टफोलियोमध्ये आतापर्यंत एकही इलेक्ट्रिक कार नव्हती. आज ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीनं जगासमोर ठेवलेली कार एक कॉन्सेप्ट कार आहे. परंतु कंपनीनं सांगितलं आहे की EVX 2025 मध्ये बाजारात लाँच केली जाईल.

कारचा लुक

मारुती सुझुकीच्या नव्या इलेक्ट्रिक कारचा लूक पाहता ही कार Maruti Baleno वर आधारित असल्याचं दिसतं. तसेच हीच बाह्य लूक देखील कर्वी आहे. तसेच यात एसयूव्ही डिजाइन मिळते. यात एरोडायनॅमिक सिल्हूट, मोठा व्हीलबेस, छोटे ओव्हरहँग्स आणि हाय ग्राउंड क्लियरन्स मिळतो. कंपनीनुसार हिची लांबी 4.3 मीटर आहे. हे देखील वाचा: ‘या’ दिवशी येतंय सरकारी कंपनीचं 4G नेटवर्क; BSNL नं सांगितली लाँच डेट

जर तुम्ही पाहिलं तर या ई-कारमध्ये पुढील बाजूला कोणतीही ग्रिल नाही. तसेच हेडलाइट्स आणि डीआरएलचा सेटअप पूर्णपणे एलईडी आहे. बाजूला ओआरवीएमच्या ऐवजी कॅमेरा आहे. दरवाजे उघडण्यासाठी फ्लश डोर हँडल्स मिळतील. सध्या हा एक कॉन्सेप्ट मॉडेल आहे, त्यामुळे निर्मिती सुरु झाल्यानंतर यात अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे.

या नव्या ईव्हीसाठी कंपनीनं नवीन डेडिकेटेड EV प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या कारमध्ये 60kWh क्षमता असलेला बॅटरी पॅक देण्यात येईल. या बॅटरी पॅकच्या मदतीनं ही कार सिंगल चार्जवर 550km पर्यंतचा प्रवास करू शकते. यात फास्ट चार्जिंग मिळेल का किंवा यात चार्जिंगचे कोणते पर्याय असतील याची माहिती अद्याप समोर आली नाही. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या अडचणीत वाढ; सुंदर डिजाइन, दमदार फीचर्ससह OPPO A78 5G ची भारतात एंट्री

तसेच हा कारची किंमत किती असेल किंवा किती व्हेरिएंटमध्ये मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार उपलब्ध होईल, हे देखील अजून समजलं नाही. परंतु कंपनीनं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की Maruti Suzuki EVX इलेक्ट्रिक कार दोन वर्षांनी म्हणजे 2025 मध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. तोपर्यंत या कारची अधिक माहिती हाती लागेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here