Xiaomi 14T आणि Xiaomi 14T Pro ची किंमत, स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी झाले लीक, जाणून घ्या माहिती

शाओमी येत्या काही आठवड्यांमध्ये आपली 14 टी सीरीज घेऊन येऊ शकते. यानुसार Xiaomi 14T आणि Xiaomi 14T Pro मोबाईल लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु अजून ब्रँडने घोषणा करण्याची वाट पाहावी लागणार आहे याआधी दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती लीकमध्ये समोर आली आहे. तसेच याआधी हा बेंचमार्किंग आणि सर्टिफिकेशन साईटवर पण पाहिले गेले आहेत. चला, पुढे लेटेस्ट माहितीला सविस्तर जाणून घेऊया.

Xiaomi 14T आणि Xiaomi 14T Pro किंमत आणि कलर (लीक)

  • डिलैब्सच्या रिपोर्टनुसार Xiaomi 14T च्या 12GB+256GB स्टोरेज ऑप्शनची किंमत EUR 649 म्हणजे जवळपास 60,257 रुपये असू शकते.
  • Xiaomi 14T Pro चा 12GB+512GB व्हेरिएंट EUR 899 म्हणजे जवळपास 83,491 रुपयांमध्ये येऊ शकतो.
  • Xiaomi 14T आणि Xiaomi 14T Pro फोन टायटेनियम ब्लू, टायटेनियम ब्लॅक आणि टायटेनियम ग्रे सारख्या तीन कलरमध्ये लाँच होऊ शकतो.

Xiaomi 14T चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: लेटेस्ट लीकनुसार Xiaomi 14T मध्ये 6.67-इंच 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 144Hz रिफ्रेश रेट, 4,000 निट्स पीक ब्राईटनेस, HDR10, HDR10+, डॉल्बी व्हिजन, AI टच कंट्रोल, AI आय-केअर सारखे अनेक फिचर्स मिळतात.
  • चिपसेट: हा मोबाईल MediaTek Dimensity 8300-Ultra चिपसेट असलेला असू शकतो.
  • रॅम आणि स्टोरेज: Xiaomi 14T स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा: Xiaomi 14T मध्ये ऑटोफोकस सह OIS टेक्नॉलॉजी असलेला Leica 50MP 1/1.56-इंचाचा IMX906 प्रायमरी सेन्सर, 50MP Leica x2.6 टेलीफोटो कॅमेरा आणि 12MP Leica अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स मिळू शकते. तसेच, मोबाईलमध्ये 32MP चा सेल्फी सेन्सर असू शकतो.
  • बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तर फास्ट चार्जिंग बाबत अजून माहिती मिळाली नाही.
  • इतर: हा फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंस टेक्नॉलॉजी असलेला असू शकतो. याचे डायमेंशन 160.5 x 75.1 x 7.8 मिमी आणि वजन 195 ग्रॅम सांगण्यात आले आहे.
  • ओएस: सॉफ्टवेयरच्या बाबतीत Xiaomi 14T अँड्रॉईड 14 ऑपरेटिंग सिस्टम आणि ब्रँडच्या लेटेस्ट UI वर काम करू शकतो.

Xiaomi 14T Pro चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Xiaomi 14T Pro मध्ये पण 6.67-इंचाची 1.5K अ‍ॅमोलेड स्क्रीन दिली जाऊ शकते. यावर 144Hz रिफ्रेश रेट, 4,000 निट्स पीक ब्राईटनेस, HDR10, HDR10+, डॉल्बी व्हिजन, AI टच कंट्रोल, AI आय-केअर काला सपोर्ट असू शकतो.
  • चिपसेट: Xiaomi 14T Pro संभवतः MediaTek Dimensity 9300+ चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.
    रॅम आणि स्टोरेज: Xiaomi 14T Pro फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा: प्रो मोबाईलमध्ये रिअर पॅनलवर OIS टेक्नॉलॉजी असलेला Leica 50MP प्रायमरी लेन्स अपग्रेडेड 1/1.31-इंचाचा लाइट फ्यूजन 900 सेन्सर आणि ऑटोफोकस सह येऊ शकतो. यात 50MP Leica x2.6 टेलीफोटो सेन्सर आणि 12MP Leica अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा पण मिळू शकतो. तसेच, सेल्फीसाठी 32MP चा लेन्स असू शकते.
  • बॅटरी आणि चार्जिंग: Xiaomi 14T Pro मध्ये 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळण्याची संभावना आहे.
  • इतर: हा मोबाईल पण IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस टेक्नॉलॉजीसह ठेवला जाऊ शकतो. तसेच याचे डायमेंशन 160.4 x 75.1 x 8.39 मिमी आणि वजन 209 ग्रॅम सांगण्यात आले आहे.
  • ओएस: Xiaomi 14T Pro पण बेस मॉडेल प्रमाणे अँड्रॉईड 14 वर काम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here