स्मार्टफोन मध्ये शाओमी तर फीचर फोन मध्ये जियो ने मारली बाजी, दोन्ही ठिकाणी सॅमसंग नंबर दोन वर

स्मार्टफोन मध्ये शाओमी तर फीचर फोन मध्ये जियो ने मारली बाजी, दोन्ही ठिकाणी सॅमसंग नंबर दोन वर

वर्षाच्या सुरवातीला बातमी आली होती की शाओमी पुढे गेल्याने सॅमसंग स्मार्टफोन मध्ये नंबर दोन वर आली आहे. तसेच स्मार्टफोन नंतर आता कंपनीला फीचर फोन मध्ये पण धक्का पोचला आहे. कंपनीला या सेग्मेंट मध्ये प्रमुख मोबाईल सेवा देणार्‍या कंपनी जियो ने मागे टाकले आहे. स्मार्टफोन आणि फीचर फोन दोन्ही सेग्मेंट मध्ये सॅमसंग ला दुसरा नंबर पत्करावा लागला आहे. आत्ताच आलेल्या काउंटर प्वाइंट च्या रिपोर्ट मध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे.

या दरम्यान एक बतामी आली आहे. रिलायंस जियो मुळे फीचर फोन च्या विक्रीत वाढ झाली आहे. भारतात फीचर फोन ची विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. तर स्मार्टफोन मध्ये काही खास वेग दिसला नाही. मुख्य रिसर्च फर्म काउंटर प्वाइंट च्या मार्केट मॉनिटर सर्विस ने आपला नवीन रिपोर्ट सादर केला आहे ज्यात 2018 च्या पहिल्या तिमाहीत भारतातील मोबाईल विक्रीचा अहवाल सादर केला आहे. डुअल कॅमेरा आणि बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला शाओमी मी 6एक्स, जाणून घ्या फोन बद्दल सर्वकाही

रिपोर्ट नुसार मागच्या वर्षी या तिमाहीच्या तुलनेत वर्ष 2018 च्या पहिल्या तिमाहीत मोबाईल शिपमेंट मध्ये 48 टक्के वाढ दिसली आहे ज्यात फीचर फोन चे योगदान खुप जास्त आहे. यात अजून धक्कादायक बाब म्हणजे पहिल्यांदाच असे झाले आहे की हुआवई ब्रांड आॅनर टॉप 5 स्मार्टफोन निर्माता कंपन्यांमध्ये सामील झाला आहे.

रिपोर्ट नुसार स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये शाओमी ने आपली पकड अजूनच मजबूत केली आहे. कंपनी सॅमसंग पेक्षा खुप पुढे निघून गेली आहे. पहिल्या तिमाहीत 31.1 टक्के शेयर सह शाओमी नंबर एक वर आहे. तर दुसर्‍या नंबर वर सॅमसंग 26.2 टक्के शेयर सह आहे. तर तिसर्‍या नंबर वर वीवो आहे. या कंपनी कडे सध्या 5.8 टक्के शेयर आहे. तर 5.6 टक्के शेयर सह ओपो नंबर चार वर आणि ऑनर 3.4 टक्के शेयर सह आला आहे. मोटो आणि लेनोवो ब्रँड या यादीत दिसत नाहीत.

या तिमाहीतील इतर घडामोडी पहिल्या तर आॅनर सर्वात जलद प्रगती करणारा ब्रांड ठरला. कंपनी ने 146 टक्के वाढ नोंदवली आहे. तर शाओमी चा विकास दर 134 टक्के होता. फक्त दोन मॉडेल च्या जोरावर वनप्लस ने 112 टक्के तेजी नोंदवली आहे.

फीचर फोन बद्दल बोलायचे झाले तर जियोफोन ने सर्वांना मागे टाकले आहे. काही महिन्यांतच कंपनी ने 35.8 फीचर फोन मार्केट वर कब्जा केला आहे. तर सॅमसंग 9.8 टक्क्यांसह सॅमसंग नंबर दोन आणि तिसर्‍या क्रमांकावर चीनी कंपनी आईटेल आहे जिच्याकडे 9.4 टक्के शेयर आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटले पण जरी नोकिया नव्याने आली असली तरी तिची प्रसिध्द कमी झाली नाही आणि त्यामुळेच कंपनी 7.3 टक्के शेयर सह नंबर चार वर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here