शाओमी ने मे महिन्यात आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आपल्या मी सीरीज मध्ये तिन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. या तिन्ही स्मार्टफोंस मधील मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सर्वात ताकदवान फोन आहे जो 8जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. हा फोन भारतीय करंसी नुसार जवळपास 39,000 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण आता शाओमी फॅन्सना लवकरच या फोनचा स्वस्त वेरिएंट मिळणार आहे.
शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन बद्दल बातमी आली आहे की कंपनी या फोन च्या नव्या वेरिएंट् वर काम करत आहे. चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर शाओमी चा हा पावरफुल फोन दिसला आहे. टेना च्या या लिस्टिंग मधून समजले आहे की शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन च्या नवीन वेरिएंट्स वर काम करत आहे. साध्यतरी शाओमी चा हा फोन 8जीबी रॅम ला सपोर्ट करतो पण फोन चे नवीन वरिएंट्स 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम सह बाजारात येतील.

मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन चे हे नवीन वेरिएंट्स टेना वर 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज आॅप्शन्स मध्ये दिसले आहेत. या फोन चा 8जीबी रॅम वेरिएंट 128जीबी ला सपोर्ट करतो. आशा आहे की फोन चा 4जीबी रॅम वेरिएंट 64जीबी मेमरी ला सपोर्ट करेल आणि फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेज सह येईल. लक्षात असू द्या कि बाजारत उपलब्ध असलेला मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन माइक्रोएसडी कार्ड ला सपोर्ट करत नाही म्हणजे याची इंटरनल स्टोरेज कार्ड ने वाढवता येत आहे.
शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन मध्ये फ्रंट पॅनल च्या डिस्प्ले खाली इनविजिबल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही. तसेच या फोनचा बॅक पॅनल पण पारदर्शक म्हणजे ट्रांसपेरेंट आहे, ज्यातून फोन चे इंटरनल पार्ट्स पण बाहेरून दिसतात. हा फोन 3डी फेस रेक्नेशन टेक्निक ला सपोर्ट करतो, हा फोन 3,699 युआन मध्ये लॉन्च केला आहे जो भारतीय करंसी अनुसार 39,000 रुपयांच्या आसपास आहे.
शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन चे नवीन वेरिएंट येण्याची दाट शक्यता आहे की कंपनी याचा 4जीबी रॅम वेरिएंट लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च करेल. तर फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट पण फोन च्या सध्याच्या वेरिएंट पेक्षा स्वस्त असेल. कदाचित शाओमी हे नवीन वेरिएंट ग्लोबल मॉडेल म्हणून सादर करेल. पण नवीन वेरिएंट मध्ये कोणते नवीन फीचर किंवा कोणते वेगळे स्पेसिफिकेशन्स सह येतील यासाठी कंपनी च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघावी लागेल.















