शाओमी ने आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत मी सीरीज चा नवीन स्मार्टफोन मी 8 लॉन्च केला होता. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला होता जो 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. आता शाओमी मी 8 च्या अजून दोन वेरिएंट्स वर काम करत आहे जे 8जीबी रॅम तसेच 4जीबी रॅम सह सादर केले जातील.
शाओमी मी 8 चा हा नवीन वेरिएंट टेना वर दिसला आहे तिथे हा एम1803ई1टी मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग वरून समजले आहे की कंपनी मी 8 च्या दोन नवीन वेरिएंट वर काम करत आहे आणि यात 8जीबी रॅम वेरिएंट आणि 4जीबी रॅम वेरिएंट आहेत. शाओमी मी 8 चा 8जीबी रॅम वेरिएंट मोठ्या बजेट सेग्मेंट मध्ये येईल तर मी 8 चा 4जीबी रॅम वेरिएंट लो बजट मध्ये उपलब्ध होईल.
शाओमी मी 8 च्या या नवीन वेरिएंट्स मध्ये रॅम व्यतिरिक्त अन्य स्पेसिफिकेशन्स 6जीबी रॅम वेरिएंट सारखे आहेत. शाओमी मी 8 हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो ग्लास बॉडी सह प्रीमियम मेटल बॉडी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण अॅप्पल च्या एनिर्वसरी स्पेशल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले आजी वर्टिकल रियर कॅमेरा सह आला आहे. या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
शाओमी मी 8 शाओमी ने सादर केलेल्या मीयूआई 10 वर लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 च्या बॅक पॅनल वर एआई टेक्निक असलेला डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.
मी 8 चा सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्निक वर चालतो. शाओमी मी 8 च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये इंफ्रारेड फेस अनलॉक टेक्निक पण आहे. या फोन मध्ये 4जी वोएलटीई, एनएफसी, यूएसबी टाईप-सी व डुअल-फ्रिक्वेंसी जीपीएस तसेच डुअल-बँड वाई-फाई सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
शाओमी मी 8 ची किंमत पाहता फोन चा 64जीबी वेरिएंट 2,699 युआन (जवळपास 28,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन चा 128जीबी वेरिएंट 2,999 युआन (जवळपास 31,600 रुपये) आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 युआन (जवळपास 34,800 रुपये) च्या किंमतीत बाजारात आला आहे. तर शाओमी ने मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 3,699 युआन च्या किंमतीत लॉन्च केले आहे जो भारतीय करंसी नुसार 39,000 रुपयांच्या जवळपास आहे.
















