येत आहे Mi A3 आणि Mi A3 Lite, Xiaomi च्या अधिकाऱ्याने केले ट्वीट

Xiaomi Mi A Series चा विस्तार करण्याची योजना करत आहे ज्याबद्दल सकाळीच आम्ही माहिती दिली होती. एका मीडिया रिपोर्ट मध्ये या सीरीज अंतर्गत लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्स Mi A3 आणि Mi A3 Lite च्या स्पेसिफिकेशन्स संबंधित महत्वाची माहिती समजली होती. या रिपोर्ट मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सच्या चिपसेटची माहिती मिळाली होती. आता Xiaomi या सीरीज मधील Mi A3 अधिकृतपणे टीज केला आहे. त्यामुळे निश्चित झाले आहे कि Mi A3 आणि Mi A3 Lite लवकरच बाजारात येतील.

Mi A3 सीरीज बद्दल हि माहिती स्वतः Xiaomi Global Spokesperson, Donovan Sung यांनी दिली आहे. शाओमीच्या अधिकाऱ्यांनी थेट Mi A3 आणि Mi A3 Lite फोनचे नाव घेतले नाही पण सूंग यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल वरून Mi A सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च असलेच सांगितले आहे. आपल्या ट्वीट मध्ये शाओमीच्या प्रवकत्यांनी गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Mi A2 आणि Mi A2 Lite चे नाव घेत विचारले आहे कि, यावर्षी यूजर्सना आगामी फोन मध्ये काय हवे आहे. ट्वीट मध्ये ‘Innovation For Everyone’ हॅशटॅगचा वापर पण केला आहे.

Xiaomi Mi A3 आणि Mi A3 Lite बद्दल आज पण एका वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले होते कि Xiaomi लवकरच आपली ‘ए सीरीज’ टेक मंच वर सादर करणार आहे आणि नावानुसारच Mi A3 सीरीजचा मोठा वेरिएंट असेल तर Mi A3 Lite स्वस्त बजेट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि Xiaomi Mi A3 कंपनी द्वारा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर लॉन्च केला जाईल तसेच कंपनी Mi A3 Lite स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह बाजारात घेऊन येईल.

रिपोर्ट मध्ये Xiaomi Mi A3 चे कोडनेम ‘bamboo_sprout’ सांगण्यात आले आहे तसेच Xiaomi Mi A3 Lite ला ‘cosmos_sprout’ कोडनेम देण्यात आले आहे. फोनच्या चिपसेटच्या माहिती सोबतच असे पण सांगण्यात आले आहे कि Xiaomi आगामी काळात हा स्मार्टफोन टेक मंचावर सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर पण M1906F9SH मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता.

फेडरल कम्यूनिकेशन्स कमीशन वेबसाइट म्हणजे FCC वर फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला होता ज्यावरून डिवाईसची डिजाईन समजते. Xiaomi Mi A3 च्या बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला कॅमेरा कट दाखवण्यात आला आहे. हा कॅमेरा कट वर्टिकल शेप मध्ये आहे ज्यात तीन रियर कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. या कॅमेरा सेटअपच्या खाली नीचे फ्लॅश लाईटचा होल पण आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here