लॉन्चच्या आधीच बघा Xiaomi Mi CC9 आणि Mi CC9e चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स, वेबसाइट वर झाले आहेत लिस्ट

Xiaomi येत्या 2 जुलैला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच दिवशी कंपनी आपली नवीन ‘CC सीरीज’ जगासमोर येईल. या सीरीज अंतर्गत Mi CC9 आणि Mi CC9e स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती तर आज कंपनीचे सीईओ ली जून यांनी सांगितले कि या सीरीज मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वाला CC9 Meitu कस्टम एडिशन पण लॉन्च केला जाईल. लीक्स दरम्यान Xiaomi Mi CC चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण अपडेट केला आहे ज्यामुळे लॉन्चच्या आधीच सीरीजच्या आगामी स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

सर्टिफिकेशन्स साइट टेना वर Mi CC सीरीजचे दोन स्मार्टफोन्स लिस्ट केले गेले आहेत ज्यांचा मॉडेल नंबर M1904F3BT आणि M1906F9SC आहे. बोलले जात आहे कि M1904F3BT Mi CC9 स्मार्टफोनचा मॉडेल नंबर आहे तर Mi CC9e स्मार्टफोन M1906F9SC मॉडेल नंबर सह बाजारात येईल. टेना च्या लिस्टिंग मध्ये या दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्सच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे.

Xiaomi Mi CC9

M1904F3BT मॉडेल नंबर वाले स्मार्टफोन म्हणजे Mi CC9 टेना वर 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह येईल असे दाखवण्यात आले आहे जो फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येईल. या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई दिला जाईल जो टेना अनुसार 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या नवीन चिपसेट पैकी एक स्नॅपड्रॅगॉन 730 वर चालेल.

टेना नुसार Mi CC9 तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या वेरिएंट्स मध्ये 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी, 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते. तसेच माहिती नुसार फोटोग्राफी साठी Mi CC9 मध्ये 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल आणि सेल्फी साठी हा फोन 32-मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,940एमएएच ची बॅटरी असेल.

Xiaomi Mi CC9e

M1906F9SC मॉडेल नंबर वाल्या Mi CC9e स्मार्टफोन साठी टेना वर सांगण्यात आले आहे कि कंपनी हा फोन 6.088-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करू शकते. लिस्टिंग मध्ये फोनच्या वेरिएंट्स आणि प्रोसेसरची माहिती तर नाही पण सांगण्यात आले कि हा मॉडेल पण एंडरॉयड 9.0 पाई आधारित मीयूआई 10 वर सादर केला जाईल. तसेच पावर बॅकअप साठी Mi CC9e मध्ये पण 3,940एमएएच ची बॅटरी असेल.

विशेष म्हणजे Xiaomi Mi CC9e च्या रॅम व स्टोरेज वेरिएंट्सची माहिती कालच एका मीडिया रिपोर्ट मध्ये आली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि कंपनी Mi CC9e चार वेरिएंट्स सह चीन मध्ये लॉन्च करेल. या वेरिएंट्स मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम + 128जीबी इंटरनल स्टोरेज असेल.

कलर वेरिएंट्स पाहता लीक नुसार Mi CC9e सफेद, ब्लू प्लेनेट आणि नाईट प्राइस शेड मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तर Mi CC9 ब्लॅक, रेड, ब्लू, पिंक, व्हाईट, ग्रीन, पर्पल आणि ग्रे कलर मध्ये बाजारात येऊ शकतो. टेना लिस्टिंग मध्ये Xiaomi Mi CC9 आणि Mi CC9e चे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे तरीही जोपर्यंत कंपनी हे स्मार्टफोन्स लॉन्च करत नाही तोवर या माहितीवर विश्वास ठेवता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here