Vivo Y200i ची किंमत, डिझाईन, स्पेसिफिकेशन आले समोर, लाँचच्या आधी या साईट्सवर आला फोन

विवो एक नवीन वाय-सीरिज स्मार्टफोन Vivo Y200i लाँच करण्याची तयारी करत आहे. सध्या फोनची अधिकृत माहिती मिळाली नाही, परंतु लाँचच्या आधी हा बेंचमार्किंग साईट गीकबेंच, 3C सर्टिफिकेशन आणि चायना टेलीकॉम वेबसाईटवर दिसला आहे. ज्यात याची डिझाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमती पर्यंतची माहिती मिळाली आहे. चला, पुढे तुम्हाला मोबाईलची पूर्ण माहिती देत आहोत.

Vivo Y200i डिझाईन (चायना टेलीकॉम लिस्टिंग)

  • चायना टेलीकॉम लिस्टिंगमध्ये फोनचे फोटो समोर आले आहे.
  • तुम्ही पाहू शकता की विवो वाय200आई पंच होल नॉच आणि थिक चिन डिस्प्लेसह आहे.
  • स्मार्टफोनमध्ये बॅकवर गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे, जिथे ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश आहे.
  • Vivo Y200i मध्ये 3.5 मिमी ऑडियो जॅक, स्पिकर ग्रिल, प्रायमरी मायक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट टॉप एजवर देण्यात आला आहे. तर पावर आणि वॉल्यूम रॉकर उजव्या साईडवर आहेत.
  • कलर ऑप्शन पाहता Vivo Y200i पांढऱ्या कलरमध्ये समोर आला आहे.
  • फोनचे वजन जवळपास 199 ग्रॅम आणि माप 165.70×76.00×7.99mm सांगण्यात आले आहे.

Vivo Y200i ची किंमत आणि स्पेक्स (चायना टेलीकॉम लिस्टिंग)

  • Vivo Y200i तीन स्टोरेज मध्ये येऊ शकतो. ज्यात 8GB रॅम+256GB स्टोरेज, 12GB रॅम+256GB स्टोरेज आणि 12GB रॅम+512GB स्टोरेजचा समावेश आहे.
  • बेस मॉडेलची किंमत CNY 1,799 जवळपास 21,200 रुपये, मिड व्हेरिएंटची CNY 1,899 जवळपास 22,300 रुपये आणि टॉप ऑप्शन CNY 1,999 म्हणजे भारतीय किंमतीनुसार 23,500 रुपयांचा असू शकतो.
  • लिस्टिंगनुसार समझले आहे की Vivo Y200i स्मार्टफोनमध्ये 2408×1080p रिजॉल्यूशन असलेला डिस्प्ले असेल.
  • बॅटरीच्या बाबतीत नवीन फोन 6,000mAh ची बॅटरी असलेला सांगण्यात आले आहे.

Vivo Y200i गीकबेंच आणि 3 सी लिस्टिंग

  • गीकबेंच आणि 3सी लिस्टिंगमध्ये Vivo Y200i चे मॉडेल नंबर V2354A आहे.
  • फोनने गीकबेंच 4.4 बेंचमार्क टेस्टच्या सिंगल-कोर राउंडमध्ये 3,199 अंक आणि मल्टी-कोर राउंडमध्ये 7,931 अंक मिळवले आहेत.
  • लिस्टिंगनुसार हा फोन एड्रेनो 613 जीपीयू आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर असलेला सांगण्यात आले आहे.
  • चिपसेटची माहितीवरून असे वाटत आहे की फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 मिळू शकतो.
  • हा मेमेरीच्या बाबतीत 8GB पर्यंत रॅम आणि अँड्रॉईड 14 ऑपरेटिंग सिस्टम असलेला सांगण्यात आले आहे.
  • जर चीनच्या 3C सर्टिफिकेशनबाबत बोलले तर हा Vivo Y200i फोन 44W फास्ट चार्जिंगसह आहे. तसेच इतर माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here