5,800एमएएच बॅटरी आणि 48-एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च होऊ शकतो शाओमी मी मॅक्स 4 प्रो

शाओमी ने अलीकडेच आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत रेडमी नोट 7 स्मार्टफोन लॉन्च केला होता. रेडमी नोट 7 कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे जो 48-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात येईल. एक ताजा बातमी समोर येत आहे कि शाओमी मी मॅक्स 4 स्मार्टफोन वर पण काम करत आहे आणि हा स्मार्टफोन पण 48-मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. नव्या लीक मध्ये मी मॅक्स 4 सोबत मी मॅक्स 4 प्रो ची माहिती समोर आली आहे ज्यात दोन्ही फोनच्या महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समजले आहेत.

शाओमी मी मॅक्स 4 आणि मी मॅक्स 4 प्रो बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 48-मेगापिक्सलच्या सॅमसंगच्या आईएसओसेल जीएम1 कॅमेरा सेंसर सह येईल. फोनच्या कॅमेरा सेटअप मध्ये सुपर नाईट सीन कॅमेरा मोड दिला जाईल जो अंधारात पण चांगले फोटो क्लिक करण्यास सक्षम असेल. मी मॅक्स 4 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन टियर-ड्रॉप नॉच वर सादर केला जाईल जो 7.2-इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोनचे दोन्ही पॅनल्स गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले जातील.

अशाप्रकारे मी मॅक्स 4 प्रो च्या डुअल रियर कॅमेऱ्यापण माहिती लीक मध्ये समोर आली आहे. लीकनुसार मी मॅक्स 4 प्रो च्या बॅक पॅनल वर एक कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा कॅमेरा सेंसर 20-मेगापिक्सल वाला असेल. यातील एक कॅमेरा सेंसर सोनी आईएमएक्स586 चा असेल. तसेच लीक मध्ये सांगण्यात आले आहे​ कि मी मॅक्स 4 प्रो इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसरला पण सपोर्ट करेल.

मी मॅक्स 4 लीक नुसार क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो तर मी मॅक्स 4 प्रो मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळू शकतो. हे दोन्ही फोन मीयूआई 11 वर सादर होतील. लीक मध्ये मी मॅक्स 4 चे तीन वेरिएंट समोर आले आहेत ज्यात एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरीला सपोर्ट करेल. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच तिसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

शाओमी मी मॅक्स 4 तसेच मी मॅक्स 4 प्रो मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलली 5,800एमएएच ची बॅटरी मिळू शकते. शाओमी ने आता पर्यंत मी मॅक्स 4 आणि मी मॅक्स 4 प्रो च्या लॉन्चची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, पण आशा आहे कि हे स्मार्टफोन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अंर्तराष्ट्रीय मंचावर येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here