अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा सह लीक झाला Xiaomi Mi MIX 4 चा फोटो, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती

Mi MIX 4 Xiaomi च्या त्या स्मार्टफोन्स पैकी एक आहे ज्याची मार्केट मध्ये येण्याच्या अनेक दिवस आधीच चर्चा सुरु होते. शाओमी मी मिक्स 4 बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या. आधी चर्चा अशी होई कि हा डिवाईस ऑक्टोबर मध्ये टेक मंचावर येईल, पण असे नाही झाले. Xiaomi Mi MIX 4 च्या फोटोज पासून याच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती वेगवेगळ्या लीक्स मध्ये समोर येत आहे. आज पुन्हा Mi MIX 4 चा नवीन लीक इंटरनेट वर वायरल झाला आहे ज्यात फोन मध्ये अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

Xiaomi Mi MIX 4 संबंधित हे लीक स्लॅशलीकने शेयर केले आहे. वेबसाइटने मी मिक्स 4 स्मार्टफोनचे फोटोज शेयर केले आहेत ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. फोटो शेयर करण्यासोबतच दावा केला गेला आहे कि Mi MIX 4 स्मार्टफोन मध्ये अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा दिला जाईल. हा लीक इंटरनेट वर वेगाने पसरत होता पण शाओमीचे वरिष्ठ अधिकारी वैंग टेंग थॉमस यांनी पोस्ट करून हि पोस्ट ‘FAKE’ असल्याचे सांगितले.

डिस्प्लेच्या खाली लपले 2 सेल्फी कॅमेरा

Mi MIX 4 बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि फोनच्या डिस्प्लेच्या वरच्या भागात डुअल सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो स्क्रीनच्या खाली असेल. शेयर केल्या गेलेल्या फोटो मध्ये वरच्या बाजूला डिस्प्लेच्या खाली दोन सेंसर दिसत आहेत जे गोलाकार आहेत. हे दोन्ही फोनचे सेल्फी कॅमेरा सांगण्यात आले होते. पण शाओमीच्या प्रवक्त्यांनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करत स्पष्ट केले आहे कि समोर आलेला फोटो Xiaomi Mi MIX 4 चा नाही.

असा असेल लुक

Mi MIX 4 च्या डिजाईन आणि लुक बद्दल बोलायचे तर ताज्या ईमेज मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये मी मिक्स 4 स्मार्टफोन पूर्णपणे बेजल लेस दिसत आहे. फोनच्या डिस्प्लेच्या चारही बाजूला कोणताही बॉडी पार्ट देण्यात आलेला नाही. Mi MIX 4 चा डिस्प्ले साईड पॅनलच्या इथे मागच्या बाजूला कर्व्ड आहे. या फोन मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच नाही. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. आधी लीक झालेल्या फोटोज मध्ये Xiaomi Mi MIX 4 स्लाईडर पॅनल वर दाखवण्यात आला होता.

हे देखील वाचा: 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास

Xiaomi Mi MIX 4

लीक्स नुसार हा फोन सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे शानदार स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह येईल. या फोन मध्ये एमोलेड 2के रेज्ल्यूशन वाली डिस्प्ले मिळू शकतो जो एचडीआर10+ क्वॉलिटी देईल. लीक्स नुसार Xiaomi Mi MIX 4 चा डिस्प्ले 120हर्ट्ज च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. Xiaomi Mi MIX 4 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 12जीबी रॅमला सपोर्ट करेल. फोनच्या या वेरिएंट मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

त्याचबरोबर Mi MIX 4 मध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल आणि दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ दिला जाऊ शकतो. हा शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो MIUI 11 सह येईल. Mi MIX 4 बद्दल बोलले जात होते कि हा फोन Xiaomi चा पहिला डिवाईस असू शकतो जो 108-मेगापिक्सल कॅमेरा टेक्नॉलॉजी सह लॉन्च होईल. पण Xiaomi ने घोषणा केली आहे कि Mi Note 10 आणि CC9 Pro 108 मेगापिक्सलच्या Samsung ISOCELL Bright HMX सेंसर सह लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर

Xiaomi Mi MIX 4 मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असल्याचे बोलले जात आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनची बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन यूएफएस 3.1 स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच Mi MIX 4 आईपी68 रेटिंग सह बाजारात येऊ शकतो. फोनचे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत खरे म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Xiaomi हा टेक मंचावर सादर करत नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here