POCO M3 सध्या टॉप ट्रेंडिग स्मार्टफोन्स मध्ये सामील आहे. हा फोन आता भारतात लॉन्च झाला नाही पण पोको फॅन्स याची आतुरतेने वाट बघत आहेत. पण आता वाटत आहे कि हि प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पोकोने भारतात अधिकृतपणे या फोनचा टीजर व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा पण झाला आहे. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये पोको एम3 भारतात लॉन्च होईल.
पोको इंडियाने आपल्या यूट्यूब चॅनेल वर POCO M3 चा टीजर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये पोको एम3 स्मार्टफोन वेगवेगळ्या युजर्सना दाखवला जातो आणि फोनच्या डिस्प्ले, डिजाईन सोबतच याच्या गेमिंग परफॉर्मन्सची वैशिष्ट्ये सांगितली जातात. कंपनीने आतापर्यंत फोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली नाही पण हा व्हिडीओ शेयर केल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच फोनची लॉन्च डेट पण सांगेल.
POCO M3
पोको एम3 ची डिजाइन पाहता हा फोन डुअल-टोन फिनिश असलेल्या रियर पॅनल सह सादर केला गेला आहे. POCO M3 स्मार्टफोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात डिस्प्ले तिन्ही बाजूंनी पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. आशा आहे कि पावर बटन फिंगरप्रिंट सेंसर एम्बडेड असेल.
हे देखील वाचा :
हा फोन फुलएचडी+ पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या आयपीएस एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तसेच, या फोन मध्ये 6.53 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइन वर बनलेला असेल. पोको एम3 चा हा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयुआय 12 सह चालतो. सोबतच आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट फोन मध्ये आहे.

फोनचा रियर पॅनल पाहता पोको एम3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकली आहेत ज्यांच्या बाजूला एलईडी लाईट आणि लेंस डिटेल लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे कंपनीची ब्रँडिग आहे. ज्याचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. तर, दुसरीकडे फोनचे इतर अन्य दोन रियर कॅमेरा सेंसर पाहता यात 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, त्यातील एक डेप्थ आणि एक मॅक्रो सेंसर आहे. हा फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येते.
शाआोमी पोको एम3 व्हिडीओ














