Redmi Note 10 Pro चा 5G मॉडेल पण होईल लॉन्च, फोनमध्ये मिळेल स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट

Redmi note 10 pro चा फोटो

Xiaomi ने सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या रेडमी नोट 10 चा विस्तार करणार आहे आणि याअंतगर्त येत्या 13 मेला भारतात कंपनीचा नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन Redmi Note 10S लॉन्च केला जाईल. हा गेमिंग फोन 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. रेडमी नोट 10एस भारतात येण्यापूर्वी बातमी आली आहे कि कंपनी आपल्या ‘नोट 10’ सीरीजमध्ये एक नवीन 5जी फोन पण जोडण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार हा नवीन मोबाईल फोन Redmi Note 10 Pro 5G नावाने लॉन्च केला जाईल. (Xiaomi Redmi Note 10 Pro 5G Phone Specs Price launch soon)

Redmi Note 10 Pro 5G फोनची माहिती इंडियन टिपस्टर अभिषेक यादवच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनुसार शाओमी कंपनी लवकरच रेडमी नोट 10 प्रो 5जी फोन अनाउंस करू शकते. या सीरीजमध्ये आतापर्यंत Redmi Note 10 च 5जी सपोर्टसह लॉन्च झाला होता. फोनच्या माहिती सोबतच रेडमी नोट 10 प्रो 5जी ची टीजर ईमेज पण इंटरनेटवर शेयर करण्यात आली आहे ज्यात फोनच्या डिजाईन सोबतच याच्या बऱ्याच महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण झाला आहे.

लीक झाले डिटेल

Redmi Note 10 Pro 5G बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट डुअल बॅंड 5जीला सपोर्ट करतो. फोनच्या टीजर ईमेजमध्ये रियर कॅमेरा डिजाईन पण दाखवण्यात आली आहे. बॅक पॅनलवर डावीकडे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये सर्वात वर एक मोठी लेंस, त्याखाली हॉरिजॉन्टल शेपमध्ये दोन लेंस आणि मग एक मोठी लेंस आहे. टीजर ईमेजने स्पष्ट केले आहे कि रेडमी नोट 10 प्रो 5जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि यूएसबी टाईप-सी पोर्टला पण सपोर्ट करेल.

Redmi Note 10S

अलीकडेच कंपनीने टीज केलेल्या रीटेल बॉक्सच्या फोटोनुसार Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रमुख कॅमेरा असेल आणि हा फोन MIUI 12.5 वर काम करेल. तसेच, फोनमध्ये तीन कलर ऑप्शन खरेदीसाठी उपलब्ध असतील, ते आहेत ब्लू, डार्क ग्रे आणि व्हाइट. फोनबद्दल टीज केले गेले आहे कि हा गेमिंग सेंट्रिक फोन असेल, ज्यात Hi-Res Audio सपोर्ट आणि सुपर डिस्प्ले फीचर केला जाईल.

हे देखील वाचा : Jio चे स्वस्त Recharge Plans, रोज 2GB पर्यंत डेटा असलेल्या या टॉप प्लानबाबत जाणून घ्या सर्वकाही

Redmi Note 10s चा फोटो

या फोनच्या ग्लोबल वर्जनचे स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा अँड्रॉइड 11 आधारित MIUI 12.5 वर सादर केला होता. यात 6.43 इंचाचा फुल एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड होल-पंच डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी995 प्रोसेसर देण्यात आला होता. तसेच या फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली होती जी 33 वॉच फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगपिक्सलचा, सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे. रेडमी नोट 10एस 13 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह लिस्ट झाला आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर व AI Face Unlock सपोर्ट मिळू शकतो. आशा आहे कि या फोनची किंमत 12,499 रुपयांच्या आसपास असू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here