देशातील दिग्गज नेटवर्क प्रोवाइडर कंपनी Reliance Jio भारतात आपले एकापेक्षा एक प्रीपेड प्लान सादर करत आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या त्या प्लानची माहिती देत आहोत जे कमी किंमतीत जास्त फायदे देतात. इथे आम्ही तुम्हाला मार्केटमधील जियो फोनच्या टॉप 3 स्वस्त अनलिमिटेड डेटा प्रीपेड प्लानबाबत माहिती देत आहोत. या सर्व प्लान्सच्या संपूर्ण फायद्यांसह किंमत पण सांगणार आहोत. तसेच या सर्व प्लान्समध्ये तुम्हाला Jio अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळत आहे. (JioPhone top 3 plan 2GB data free calling)
JioPhone चा 125 रुपयांचा प्लान
125 रुपयांच्या जियो फोन प्रीपेड रीचार्ज प्लानबाबत बोलायचे झाले तर या प्लानसह युजर्सना रोज 0. 5 जीबी हाई-स्पीड डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह 500 नॉन-जियो मिनट्स मिळतात. तसेच अनलिमिटेड जियो-टू-जियो वॉयस कॉलिंग आणि 300 एसएमएस पण दिले जात आहेत.
JioPhone चा 155 रुपयांचा प्लान
155 रुपयांच्या Jio Phone प्लानमध्ये युजर्सना रोज 1 जीबी हाई-स्पीड डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह 500 नॉन-जियो मिनट्स मिळतात. इतकेच नव्हे तर या प्लानमध्ये अनलिमिटेड जियो-टू-जियो वॉयस कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएस दिले जात आहेत.
हे देखील वाचा : नवीन PUBG मोबाईल येईल भारतात, यावेळी नाव असेल Battle Ground Mobile India, जाणून घ्या कधीपासून करता येईल डाउनलोड
JioPhone चा 185 रुपयांचा प्लान
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील शेवटचा प्लान 185 रुपयांचा आहे. यात जियो फोन युजर्सना रोज 2 जीबी हाई-स्पीड डेटा, 500 नॉन-जियो वॉयस कॉलिंग मिनिट्स, अनलिमिटेड जियो-टू-जियो कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळतात. या प्लानची वैधता पण 28 दिवस आहे.
Jio Exclusive Smartphone
अलीकडेच बातमी मिळाली होती कि रिलायंस जियो या महिन्यात म्हणजे मेमध्ये आपला स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात आणेल. हा स्मार्टफोन टेक ब्रँड itel सोबत मिळून बनवला जाईल तसेच Jio Smartphone स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा : OPPO K9 5G लॉन्च, यात आहे 64 MP कॅमेरा, 90Hz स्क्रीन आणि 65w चार्जर
Jio Smartphone ची निर्मिती रिलायंस जियो आणि आयटेल मिळून केली जाईल. इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्यांचा लक्ष्य कमी किंमत अफॅार्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये घेऊन येण्याचे आहे आणि या नवीन Jio Exclusive Smartphoneच्या माध्यमातून दोन्ही कंपनी आपले उद्देश साध्य करतील. जियो स्मार्टफोनच्या माध्यमातून त्या मोबाईल ग्राहकांना टारगेट केले जाईल जे सध्या फीचरफोन वापरत आहेत. म्हणजे फीचर फोन युजर्सना स्मार्टफोन युजरमध्ये बदलण्याच्या हेतूने हा जियो एक्सक्लूसिव आयटेल फोन भारतात लाॅन्च केला जाईल.
















